मोहोळ : वडवळ थांब्यावर घरगुती सिलेंडरमधील गॅस चोरुन रिक्षांमध्ये भरत असताना मोहोळ पोलिसांनी धाड टाकून दोघांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी रिक्षा, आठ गॅस सिलेंडर टाक्या आणि इतर साहित्य असा १ लाख ७५ हजारांचा ऐवज पळविला.
शनिवारी सायंकाळी ५.३० वाजता मोहोळ पोलिसांनी ही कारवाई केली.
पोलीस सूत्राकडील माहितीनुसार वडवळ स्टॉप परिसरात वाहनांमध्ये बेकायदेशीररित्या घरगुती सिलेंडरच्या टाकीतून गॅस भरून दिला जात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांना मिळाली होती. त्यानंतर सायकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल शरद डावरे, गणेश दळवे, हरिदास थोरात यांच्या पथकाने धाड टाकली. या कारवाईदरम्यान रोहीत बाळासाहेब लबे (वय २८ रा. वडवळ) हा धरगुती सिलेंडरमधून गॅस बेकायदेशीर व धोकादायकरित्या ॲटो रिक्षा (एम.एच.१३ सी.टी. ७३५९) मध्ये भरत असताना आढळला. नीतीन नागनाथ मोरे (वय ३० वर्षे रा. वडवळ, ता. मोहोळ) याच्या ॲटो रिक्षामध्ये इलेक्ट्रीक मोटरच्या सहाय्याने इंधन म्हणून गॅस भरला जात असताना ही कारवाई झाली.
याप्रकरणी पोलीस हेडकॉन्स्टेबल शरद ढावरे यांनी फिर्यादी दिली असून रोहीत लबे याच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार शरद ढावरे करित आहेत .
---
२० मोहाेळ क्राईम
घरगुती गॅस रिक्षात भरत असताना मोहोळ पोलिसांनी कावाई करुन सिलेंडर टाक्यासह दोघांना ताब्यात घेतले