सोलापूर : राज्यात अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यांचे प्रमाण जवळपास ७ टक्के आहे़ वर्षभरात आतापर्यंत २३०० गुन्हे अॅट्रॉसिटी अॅक्टखाली दाखल झाले आहेत़ तसेच महिला अत्याचाराचे प्रमाण २२ टक्के एवढे आहे़ राज्यात वर्षभरात १० हजारांपेक्षा जास्त गुन्हे महिला अत्याचार अॅक्टखाली दाखल झाल्याची माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक (मानवाधिकार) खालिद कैसर यांनी दिली़अॅट्रॉसिटीखाली दाखल केसेसचे प्रमाण पाहता संबंधितांवर शिक्षा होण्याचे प्रमाण फारच कमी आहे. याबाबत विचारले असता कैसर म्हणाले की, आता राज्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यास व्हिडीओ कॅमेरे पुरविण्यात आले आहेत़ प्रारंभी साक्षीदार व फिर्यादीचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करण्याच्या सूचना दिल्या आहेत़ त्यामुळे साक्षीदार फुटण्याचे प्रमाण कमी होणार आहे़ या गुन्ह्यांचा निकाल लवकरात लवकर लागावा, यासाठी जिल्हा पातळीवर विशेष न्यायालयांची निर्मिती लवकरच होईल, असेही कैसर यांनी सांगितले़ याशिवाय तपास लवकर पूर्ण व्हावा, यासाठी अधिकाºयांना प्रशिक्षण देण्याचे कामही सुरू आहे़ अॅट्रॉसिटी गुन्ह्यांचा तपास प्रामुख्याने उपविभागीय पोलीस अधिकारी दर्जाच्या अधिकाºयांकडे देण्यात येत आहे़ गुन्हे कमी व्हावेत व गुन्हेगारांना तत्काळ शिक्षा व्हावी, यासाठी शासन प्रयत्न करीत असल्याचेही कैसर यांनी सांगितले़ अॅट्रॉसिटी कायदा रद्द कराव, अशी मागणी मराठा क्रांती मुक मोर्चाद्वारे करण्यात आली होती़ मात्र अॅट्रॉसिटीची आकडेवारीत पाहता हा कायदा रद्द करणे धोक्याचे ठरू शकते, असे मत व्यक्त केले जात आहे़