उत्तर सोलापूर तालुक्यातील गावोगावी ताप, थंडी, सर्दी, खोकला, अंगदुखीचा आजार वाढत आहे. यातून डेंग्यूसारख्या आजाराला बळी पडावे लागत आहे. यामुळे धुरळणी करुन डासांची उत्पत्ती थांबविण्यास मदत होत आहे. यामुळे धुरळणी करण्याच्या सूचना ग्रामपंचायतींना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार वांगी, साखरेवाडी, राळेरास, पाकणी, नरोटेवाडी, नान्नज, कोंडी, खेड, कवठे, कौठाळी, कळमण हिरज, हगलूर, एकरुख, डोणगाव, भागाईवाडी, बेलाटी, बाणेगाव, अकोलेकाटी या ग्रामपंचायतींनी गावात धुरळणी केली असल्याचे पंचायत समितीकडून सांगण्यात आले.
बाणेगाव, बेलाटी, भागाईवाडी, हिरज, कळमण व पाकणी या ग्रामपंचायतींनी दोनवेळा धुरळणी करण्याची दक्षता घेतली आहे. सभापती रजनी भडकुंबे व बीडीओ प्रशांत देशमुख हे दररोज मेसेजद्वारे धुरळणी करण्यासाठी पाठपुरावा करीत असल्याचे सांगण्यात आले.
----
जून महिन्यापासून ज्या गावात पाऊस पडत आहे तेथे दलदल निर्माण होऊन डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. आरोग्य विभागाने गाव पातळीवरील ग्रामपंचायतींना धुरळणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. नागरिकांच्या आरोग्यासाठी दोन- तीन वेळा धुरळणी करावी.
- रजनी भडकुंबे
सभापती, उत्तर तालुका
----