या कार्यक्रममध्ये प्रा. अनिता सराटे- शेळके गृहविज्ञान शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र, सोलापूर यांनी सेंद्रिय व गावरान भाजीपाला बियाणे वापरून पोषण बाग निर्मिती काळाची गरज, पोषण बागेचे व्यवस्थापन, सकस व समतोल आहार याविषयी महिला शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच परसबागेचे गंगामा मॉडेलचे प्रात्यक्षिक करून दाखवले. यामध्ये सोळा प्रकारच्या भाज्या कशा लावल्या जातात, तसेच गांडूळ खत, निंबोळी खत, दशपर्णी, जीवामृत, गोमूत्र अर्क या बनवण्याच्या पद्धती वापरण्याचे प्रमाण याविषयी मार्गदर्शन केले.
प्रा. विकास भिसे यांनी सेंद्रिय परसबागेचे व्यवस्थापन व लागवड याविषयी मार्गदर्शन केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विजयश्री शिंदे, स्वाती सोनवणे, उमेद अभियान बार्शी, काकडे, अंगणवाडीसेविका व दोन्ही गावांतील प्रगतिशील शेतकरी महिलांनी योगदान दिले.
----
या कार्यक्रमामध्ये शेतकरी महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. यापुढे आम्ही गावरान बियाणे वापरून सेंद्रिय परसबाग निर्मिती करून स्वतःच्या कुटुंबासाठी आवश्यक सर्व भाजीपाला घरच्या घरीच निर्मिती करून आपले संपूर्ण गाव सुदृढ समृद्ध बनवण्याचा निर्धार केला आहे.
- अनिता सराटे, शेळके गृहविज्ञान शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र, सोलापूर
---
तीन वर्षांपासून ढोराळे गावांमध्ये चालू असलेल्या सेंद्रिय परसबागेच्या या प्रयोगाबद्दल महिलांनी आपले अनुभव कथन केले. त्यामुळे आमचे आरोग्य चांगले राहून पैशाचीही बचत झाली.
- विजयश्री शिंदे, ढोराळे शेतकरी
---
२५साकत-परसबाग