शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
2
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
3
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
4
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
6
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
7
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
8
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
9
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
10
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
11
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
12
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
13
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
14
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
15
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
16
Maharashtra Election 2024 Live Updates: भिवंडीतील राज ठाकरेंची सभा झाली, पण भाषण झाले नाही
17
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
18
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
19
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
20
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला

पंढरपूरातील ‘पालवी’त असलेल्या एचआयव्हीबाधित कन्यांचा लवकरच विवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2018 11:31 AM

मूल्यशिक्षण अन् आरोग्य सेवा : आठ वर्षे पूर्ण झालेल्यांचे होणार शुभमंगल

ठळक मुद्देमंगल शहांची मुलगी डिंपल घाडगे यांनी पंढरपूरमध्ये ‘पालवी’ हे पुनर्वसन केंद्र सुरू इथल्या मायेच्या स्पर्शाने अनेक मुलं-मुलींच्या आयुष्याला खºया अर्थाने पालवी फुटलीवटवृक्ष होण्यासाठी पालवीत वाढलेल्या या कन्यांचा लवकरच सामुदायिक विवाह

प्रभू पुजारीपंढरपूर : अनाथ एड्सबाधित मुलं-मुली आणि महिलांना आयुष्य सुखानं अन् आनंदानं जगता यावं, या हेतूने मंगल शहांची मुलगी डिंपल घाडगे यांनी पंढरपूरमध्ये ‘पालवी’ हे पुनर्वसन केंद्र सुरू केले. इथल्या मायेच्या स्पर्शाने अनेक मुलं-मुलींच्या आयुष्याला खºया अर्थाने पालवी फुटली. त्याचे वटवृक्ष होण्यासाठी पालवीत वाढलेल्या या कन्यांचा लवकरच सामुदायिक विवाह करण्याचे नियोजन असल्याचे मंगल शहा यांनी सांगितले.

बालकांचं मूलभूत हक्क एचआयव्हीबाधित बालकांनाही मिळावं, म्हणून पालवी ही संस्था कार्य करीत आहे. प्रभा-हिरा प्रतिष्ठानमार्फत पालवीचं कामकाज चालतं. इथं मुलांना पोषक आहार, शिक्षण व आरोग्य सुविधा दिल्या जातात. शिवाय चांगलं मूल्यशिक्षण देऊन स्वयंपूर्ण बनविलं जातं. 

पालवीमध्ये समाजाने नाकारलेल्या मुलांचा सांभाळ केला जातो, त्यांचं पुनर्वसन केलं जातं म्हणून पालवी या मुलांचं हक्काचं आणि प्रेमाचं घर बनलंय़ इथल्या मुलांना केवळ सहानुभूतीची गरज नाही, तर त्यांची क्षमता सिद्ध करण्यासाठी त्यांना संधी हवी आहे. त्यांची लढाई ते लढतच आहेत. त्यांच्यामधील ऊर्जा टिकवण्यासाठी गरज आहे थोडासा आधार आणि प्रोत्साहनाची. या मुलांचं जीवनमान उंचावण्यासाठी अन् त्यांना आनंद देण्यासाठी समाजानंही मदतीचा हात पुढं केला पाहिजे.

या पालवीतील मायेच्या पदराखाली वाढलेल्या काही मुलीचं वय  १८ वर्ष पूर्ण झालेलं आहे़ त्यामुळं त्यांचा एकत्रितच सामुदायिक विवाह सोहळा करण्याचं नियोजन आहे़ यापूर्वी दोन मुलींची लग्नं केली आहेत़ माढा आणि नाशिक इथं त्यांनी सुखाचा संसार थाटला आहे़ सध्या पालवीमध्ये ३३ मुलं आणि ५७ मुली आहेत़ या ठिकाणी पहिली ते दहावीपर्यंतचं शिक्षण दिलं जातं़ १० वीच्या दोन बॅच बाहेर पडल्या असून दोन्ही वर्षी १०० टक्के निकाल लागला आहे़ सध्या या संस्थेतील ६ मुली कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेतात़ येथील मुला-मुलींना शिक्षणाबरोबरच शिलाई मशीन, पेपरपासून फुले बनविणे, बाहुली, ग्रेटिंग कार्ड, नारळाच्या केशरापासून वस्तू बनविण्याचं प्रशिक्षण दिलं जातं..या बनविलेल्या वस्तू विविध ठिकाणच्या प्रदर्शनात विक्रीसाठी ठेवल्या जातात़ या सर्व गोष्टी मुलं-मुलीच करतात़ यातून त्यांना व्यवहारज्ञान अवगत व्हावं, हा यामागचा हेतू आहे.

परिपूर्ण शिक्षण- इथल्या मुला-मुलींना पहाटे योगा, त्यानंतर प्रार्थना, सकाळी नाश्ता, दुपारी जेवण, दु़ ४ वाजण्याच्या सुमारास खाऊ त्यानंतर मैदानी खेळ, सायं़ ७़३० वाजता रात्रीचे जेवण, रात्री ९ वाजता जल्लोष कार्यक्रम असतो़ त्यात गाणी, गप्पागोष्टी, नृत्य, लेख वाचन आदी कार्यक्रम घेतले जातात़ एकूण व्यक्तिमत्त्व विकास होण्यासाठी प्रयत्न केला जात असल्याचं मंगल शहा यांनी सांगितलं़ या सर्व मुला-मुलींना मंगल शहा यांच्यासह मुख्याध्यापिका वंदना पाटील, राहुल देठे, रविकिरण गुंड, प्रवीण पठाण, आऱ एस़ देवकते, राहुल थिटे यांचं मार्गदर्शन लाभतं़ 

टॅग्स :SolapurसोलापूरHIV-AIDSएड्सPandharpurपंढरपूर