शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
2
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
3
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
4
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
5
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
6
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
7
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
8
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
9
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
10
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
11
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
12
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
13
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
14
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
15
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
16
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
17
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
18
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
19
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
20
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय

सोलापुरातील महिलांनी साकारले तुरटीपासून इको फ्रेंडली बाप्पा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2019 3:01 PM

बालकामगार प्रकल्पाचा पुढाकार; सहा इंच ते सव्वा फुटापर्यंतच्या मूर्ती केल्या तयार

ठळक मुद्देमधूर सोलापूरकर या पर्यावरणाबद्दल सजग असलेल्या मूर्तीकारांनी प्रथम शाडू व कागदाच्या लगद्याचा वापर करून या मूर्ती साकारल्याकाचेसारख्या दिसणाºया तुरटीच्या मूर्तीवर कागदी,सुती रंगीबेरंगी टिकल्या लावून सजविण्यात आले आहेतुरटीच्या मूर्ती घरच्या किंवा अपार्टमेंटच्या टाकीत सहज विसर्जन करता येते

यशवंत सादूल 

सोलापूर : पर्यावरणपूरक  गणेशोत्सव साजरा करण्यासाठी शासन व  पर्यावरणवादी संघटनांकडून जनजागृती करण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून काही पर्यावरणप्रेमी मूर्तीकारांनी शाडूचे,कागदाच्या लगद्यापासून गणपती बनविले आहेत. यंदा त्यामध्ये  नावीन्याची भर घालण्यात आली असून, बालकामगार प्रकल्पाच्या पुढाकाराने १५ बचत गटातील महिलांनी तुरटीपासून तयार केलेल्या गणेशमूर्ती साकारल्या आहेत. मूर्तिकार मधूर सोलापूरकर यांनी या महिलांना हे बाप्पा साकारण्यासाठी प्रशिक्षण दिले आहे.शहर व जिल्ह्यात जाणवणारे पाण्याचे दुर्भिक्ष्य आणि उपलब्ध जलस्रोतांचे पीओपीच्या गणेशमूर्ती विसर्जनातून होणारे प्रदूषण रोखण्यासाठी तुरटीच्या गणेशमूर्ती तयार केल्या आहेत. 

मधूर सोलापूरकर या पर्यावरणाबद्दल सजग असलेल्या मूर्तीकारांनी प्रथम शाडू व कागदाच्या लगद्याचा वापर करून या मूर्ती साकारल्या; यंदा प्रथमच त्यांनी तुरटीचे गणेश साकारले आहेत. मागील चार-पाच महिन्यांपासून विविध प्रयोग केल्यानंतर त्याला यश मिळाले. काचेसारख्या दिसणाºया तुरटीच्या मूर्तीवर कागदी,सुती रंगीबेरंगी टिकल्या लावून सजविण्यात आले आहे.  तुरटीच्या मूर्ती घरच्या किंवा अपार्टमेंटच्या टाकीत सहज विसर्जन करता येते. त्यामुळे पाणी शुद्ध होते. बाळीवेस येथे या मूर्तींचे प्रदर्शन आयोजित केले आहे.

जनजागृतीवर भर- शिवकृपा आणि शिवगंगा बचतगटासह जवळपास  पंधरा बचत गटातील जवळपास ८० ते ९० महिला इकोफ्रेंडली गणेश मूर्ती बनवित आहेत. बालकामगार प्रकल्प त्यांना प्रशिक्षणासह विविध साहित्य पुरविते,त्यांच्या कामाला प्रोत्साहन देते. यातूनच मधूर सोलापूरकर यांनी यंदा तुरटीच्या मूर्ती साकारल्या आहेत. बालकामगार प्रकल्प संचालिका डॉ.अपर्णा कांबळे,रेखा जाधव,श्रीदेवी पाटील,उमा तेल्लूर,आनंदी विभूते, सुमती जोजारे,आरती आरगडे,वैशाली गुंड,सुनीता बायस, श्रुती वाळके,शेफाली विभूते या सर्व महिला इकोफ्रेंडली मूर्तीची निर्मिती करण्यासोबत पर्यावरण टिकण्यासाठी जनजागृती करीत आहेत

अशी बनते तुरटीची मूर्ती- बाजारामध्ये उपलब्ध असणारी पांढरी तुरटी यासह स्फटिक आणि पिवळ्या रंगाची तुरटी अशा तीन प्रकारच्या तुरटीची एकत्र बारीक पावडर करून घेतली जाते. त्याला चांगला आकार येण्यासाठी त्यात खडीसाखरेचे मिश्रण केले जाते. मग हे सर्व मिश्रण पाण्यात उकळून घेतले जाते. त्यानंतर द्र्रवरूपातील हे मिश्रण घनरूपात साकार करण्यासाठी ते गणपतीच्या आकारमानाप्रमाणे साचामध्ये ओतून ठेवण्यात येते. आठ ते दहा तासांनी या तुरटीला गणेशाचे रूप येते. त्यानंतर त्यावर फिनिशिंग करून टिकल्या लावून सजावट करण्यात येते.

तुरटीच्या सहा ते आठ इंच आकाराच्या गणेश मूर्ती तयार केल्या आहेत. पहिल्यांदा हा प्रयोग केला असून सोलापुरातील वारंवार होत असलेल्या दूषित पाणीपुरवठ्यावर उपयुक्त ठरावा या उद्देशाने या मूर्ती तयार केल्या आहेत. इतरांनाही प्रशिक्षण देणार आहे. -मधुर सोलापूरकर पर्यावरणपूरक महिला मूर्तिकार

टॅग्स :SolapurसोलापूरGanpati Festivalगणेशोत्सवGaneshotsavगणेशोत्सवganpatiगणपती