चिंचणी (ता. पंढरपूर) येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण व चर्चासत्राचे आयोजन केले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रांताधिकारी सचिन ढोले, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके यांच्या हस्ते वृक्षारोपण करून सोलापूर सोशल फाउंडेशनतर्फे झाडांची रोपे व गुळवेल काढ्याचे वाटप केले. यावेळी मोहन अनपट यांनी गाव विस्थापित झाल्यापासून वेगवेगळ्या अडचणीवर मात करत सुरू असलेल्या वाटचालीची माहिती दिली.
यावेळी प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी गावात गेल्या १५ वर्षांपासून लावलेली विविध प्रकारची फळे, फुलांची झाडे, औषधी वनस्पती, स्मशानभूमी, शाळा, रस्ते, ग्रामपंचायत कार्यालय, विश्रामगृहाची रचना, स्वछता, महामारीच्या काळात ही गाव कोरोनामुक्त ठेवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. यावेळी गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, अजिंक्य साबळे, प्रकाश शेटे, महेश भोसले, मारुती भोसले, कैलास भुसिंगे, सरपंच मुमताज शेख, उपसरपंच रणजित लामकाने, कुलदीप कौलगे, महादेव सोनवले, प्रकाश सोनवले, पांडुरंग कौलगे, विकास रामगुडे, हणमंत होनमाने, लतिका मोरे, गायकवाड, थोरात आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन शशिकांत सावंत यांनी केले. प्रास्ताविक मोहन आनपट यांनी केले, तर चंद्रकांत पवार यांनी आभार मानले.
...तर ऑक्सिजन कमी पडणार नाही
मागील काही महिन्यांत कोरोना महामारीत कृत्रिम ऑक्सिजन न मिळाल्याने अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. असे प्रकार देशभर समोर येत असताना चिंचणी कोरोनामुक्त का राहिली हे गावात आल्यावर समजते. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त प्रत्येकाने किमान एक झाड लावल्यास भविष्यात कृत्रिम ऑक्सिजनची गरजच पडणार नसल्याचे गटविकास अधिकारी रविकिरण घोडके यांनी सांगितले.
फोटो ओळी ::::::::::::::
चिंचणीत जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण करताना प्रांताधिकारी सचिन ढोले. यावेळी गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, रणजित लामकाने, मोहन अनपट, शशिकांत सावंत आदी.