बिबीदारफळ येथील बचत गटातील महिलांसाठी आयोजित हळदी-कुंकू कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी डाॅ. वर्षा साठे व शिक्षिका शीला ननवरे यांनी महिलांनी बचतगटाच्या माध्यमातून व्यवसाय उभा करावेत व मार्केटिंग करावे, असे आवाहन केले. बचतगटांना आतापर्यंत वसुंधरा पाणलोटचे १८ लाख २५ हजार, ११ गटांना प्रत्येकी १ लाख रुपये कर्ज तर ३० गटांना खेळते भांडवल म्हणून साडेचार लाख रुपये मिळाले आहेत. कार्यक्रमाला नवी दिशा, उन्नती व इतर ग्रामसंघाच्या शोभा सर्वगोड, मैना डोंगरे, सुवर्णा देवकुळे, मीरा सावंत, शीला सावंत, रंजना जाधव, संध्या जाधव, संगीता मोरे आदीसह ४८ बचत गटातील महिला उपस्थित होत्या.
फोटो
०७ बिबीदारफळ ०१
ओळी
बिबीदारफळ येथील बचत गटाच्या महिलांशी संवाद साधताना शीला ननवरे, डॉ. वर्षा साठे.