यावेळी त्यांनी शाळेचा स्वच्छ परिसर, भव्य इमारत, ग्रंथालय, सुसज्ज प्रयोगशाळा, कार्यालय, भव्य क्रीडांगण, गार्डन इ. पाहून समाधान व्यक्त केले. शिक्षणाधिकाऱ्यांनी वर्गात जाऊन पाहणी केली. संस्थाध्यक्ष माजी आ. जयवंतराव जगताप, प्राचार्य पी. ए. कापले, उपप्राचार्या सीमा मोरे, पर्यवेक्षक सी.के. हुनसिमरद, एस.टी. शिंदे, विज्ञान शाखा विभागप्रमुख बी. के. पाटील सर्व शिक्षक-शिक्षिका, प्राध्यापक-प्राध्यापिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे शिक्षणाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले.
मुख्याध्यापक सारोळकर, मुख्याध्यापिका नीलिमा पुंडे, अलका ढवळ शंख, कोळेकर, काटुळे आदी उपस्थित होते. सर्व मान्यवरांचे प्राचार्य कापले यांनी स्वागत केले तर पर्यवेक्षक शिंदे यांनी आभार व्यक्त केले.
०५करमाळा
करमाळ्यातील महात्मा गांधी विद्यालयात माध्यमिक शिक्षणाधिकारी बाबर यांचे स्वागत करताना प्राचार्य कापले.
----