गरीब परिस्थितीतून कुटुंबाची गुजराण करणारे व कामात कर्तव्यदक्ष असणारे हणमंत कांबळे यांचे कोरोनामुळे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलीचे शैक्षणिक भविष्य अंधारमय झाले. आपल्या सहकाऱ्याच्या कुटुंबाला आर्थिक बळ देण्यासाठी पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष प्रा. शशांक गवळी यांनी पुढाकार घेतला. सर्वांनी मिळून ६० हजार ५०० रुपयांचा निधी एकत्र करून त्यांच्या कुटुंबीयांना सुपुर्द केला.
यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिलीप पाटील, मंगळवेढा तालुकाध्यक्ष प्रा. शशांक गवळी, जालीहाळचे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष ईश्वर यजगर, उपाध्यक्ष आनंद रायबान, महेश पवार, शिवकुमार पाटील, सावकर भुसे, दत्तात्रय पाटील, जावीर पाटील, पद्माकर बनसोडे, दादासाहेब थोरबोले, जोती कांबळे, संजय गरंडे, प्रशांत पाटील उपस्थित होते.
कोट ::::::::::::::::::
कुटुंबकर्ता गेल्याने त्यामागील कुटुंबाचे खूप हाल होतात. आमचा एक सहकारी कोरोनाने हिरावल्याने त्याच्या मुलांच्या शिक्षणासाठी व कुटुंबासाठी आमच्या संघटनेतील सर्व सदस्यांनी आर्थिक मदत देऊन सामाजिक भान जपले. भविष्यातही त्या मुलांच्या शिक्षणात खंड पडू देणार नाही.
- प्रा. शशांक गवळी
तालुकाध्यक्ष, पोलीस पाटील संघटना मंगळवेढा
फोटो ओळी :::::::::::::::
जालीहाळ येथील कांबळे कुटुंबीयांकडे जाऊन मदत निधी देताना संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिलीप पाटील, तालुकाध्यक्ष प्रा. शशांक गवळी, ईश्वर यजगर, आनंद रायबान आदी.