मोहोळ तालुक्यात भूजलाच्या अनियंत्रित उपशामुळे भूजल पातळीत होत असलेली घसरण व बाधित होत असलेली गुणवत्ता थांबविण्यासाठी तालुक्यात अटल भूजल योजनेची अंमलबजाणी प्रभावीपणे आवश्यक आहे, असे आवाहन भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे वरिष्ठ भूवैज्ञानिक मुश्ताक शेख यांनी केले.
मोहोळ येथे पंचायत समिती व तालुका कृषी अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमानाने ग्रामसेवक व कृषी सहायकांच्या कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी गटविकास अधिकारी गणेश मोरे, तालुका कृषी अधिकारी सूर्यकांत मोरे, सहा. भूवैज्ञानिक शशिकांत निंबाळकर, विस्तार अधिकारी नागेश बागवाले, तांत्रिक अधिकारी विजय जाधव, सर्वेक्षक डी. बी. चंदनशिवे, जी. के. आडम, श्रीशैल बबलेश्ववर रवी गोलेकर व २४ गावांतील ग्रामसेवक व कृषी सहायक उपस्थित होते.
मुश्ताक शेख म्हणाले, शासन निर्णयानुसार जिल्ह्यात केंद्र शासन पुरस्कृत अटल भूजल योजनेची अंमलबजावणी करण्यास सुरुवता झाली आहे. त्यानुसार तालुक्यात या योजनेसंदर्भात जनजागृती करणे गरजचे आहे. ग्रामस्तरावर जलसुरक्षा आरखडा तयार करणे, पाणीपातळीसाठी निरीक्षण विहीर तसेच पिझोमीटर बसविण्यासाठी जागा निश्चित करण्याचे नियोजन करावे.
यावेळी गटविकास अधिकारी गणेश मोरे यांनी सर्व ग्रामसेवक, कृषी सहायक व तलाठी यांच्या समन्वयाने ही योजना राबविण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर शासन निर्णयानुसार प्राप्त झालेल्या प्रपत्रांमध्ये प्राथमिक माहिती भरून वरिष्ठ भूवैज्ञानिक कार्यालयास सादर करण्याच्या सूचना दिल्या.
याप्रसंगी तालुका कृषी अधिकारी सूर्यकांत मोरे यांनीही मार्गदर्शन केले.
फोटो
११मोहोळ-बैठक
मोहोळ येथे कृषी सहायक व ग्रामसेवक यांच्यासाठी आयोजित कार्यशाळेत मार्गदर्शन करताना भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे वरिष्ठ भूवैज्ञानिक मुश्ताक शेख व अन्य अधिकारी.