सर्व शाखांमधून सुमारे ३० हजार विद्यार्थी शिक्षण घेत असून, १,४०० शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत आहेत. जगदाळेमामा हॉस्पिटलही संस्थेचे आहे.
३३ सभासदांमधून पंधरा जणांचे विश्वस्त निवडणार
संस्थेचे मागील तीन वर्षांपूर्वी ४१ सभासद होते. यातील आठ जण मयत झाल्याने डॉ. गुलाबराव पाटील, डॉ. मीनाक्षी पाटील, डॉ. बी. वाय. यादव, डॉ. मीराबाई सूर्यवंशी (यादव), दिलीप मोहिते, बाळासाहेब भालके, रामचंद्र बारसकर, नलिनी बारसकर, पंडित पाटील, विष्णू पाटील, शिवाजीराव शेळवणे, चंद्रकांत मोरे, व. न. इंगळे, डॉ. उद्धव बोराडे, श्रीपती पांगरे, सोपान मोरे, डॉ. सर्जेराव माने, दिलीप रेवडकर, तानाजी शिंनगारे, प्रकाश पाटील, डॉ. प्रकाश बुरगुटे, नंदकुमार जगदाळे, अरुण देबडवार, डॉ. कृष्णा मस्तुद, डॉ. विलास देशमुख, प्रा. व्ही. तिरुपती, पिरताजी लोखंडे, नीलिमा जगदाळे, शरद कोकाटे, शशिकांत पवार, जयकुमार शितोळे, सुरेश पाटील, राजेंद्र पवार या ३३ सभासदांचा समावेश आहे.
असा आहे निवडणूक कार्यक्रम
अद्यापही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. एका उमेदवाराने अर्ज माघारी घेतल्यास बिनविरोध होईल, मात्र माघार न घेतल्यास २७ रोजी गुप्त पद्धतीने मतदान झाल्यानंतर त्याच दिवशी दुपारी निकाल जाहीर होणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी बी. ए. चव्हाण यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
संस्थाध्यक्षपद हे मानाचे
जगदाळे मामांंची संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे बार्शी व परिसरात अनन्यसाधारण महत्त्व आहे. या संस्थेचे अध्यक्षपद बार्शी शहर व तालुक्यात मानाचे पद म्हणून ओळखले जाते. जनमानसात आजवर कृष्णात राऊत, भगवंत कांबळे, संभाजी बारंगुळे, तुळजाराम जगदाळे, अॅड. शंकरराव ठोकळ, मधुकर मोहिते, एस. ए. पाटील व डॉ. बबनराव यादव या आठ जणांनी अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे, तर जनरल सेक्रेटरी म्हणून कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे, अॅड. आदिनाथ यादव (प्रभारी), ज्ञानदेव कदम, शंकरराव भोसले पाटील, मधुकर मोहिते व. न. इंगळे, विष्णू पाटील, सोपानराव मोरे व बापूसाहेब शितोळे यांनी काम पाहिले आहे.