सोलापूर शहराच्या नजिकचा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोहोळ तालुक्याच्या हायवेवरील मोहळ नगरपरिषदेला महत्व प्राप्त झाले आहे. हायवेवर असणाऱ्या नगरपरिषदेसाठी एकूण १७ प्रभाग आहेत.
२०१५ मध्ये स्थापन झालेल्या पहिल्या नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी म्हणावी अशी उमेदवारी मिळविण्यासाठी गर्दी नव्हती. परंतू या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये नगरपरिषदेसाठी मोठ्या प्रमाणात विकास निधी येत असल्याचे लक्षात आल्याने नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी तरुणाईने कंबर कसली आहे.
शहरात सत्ताधारी असणाऱ्या राष्ट्रवादीला शह देण्यासाठी शिवसेना, भाजपा, कॉग्रेससह इतर समविचारी पक्षाच्या मंडळींनी आघाडीच्या माध्यमातून बैठका सुरू केल्या आहेत.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसकडून इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यास सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी विविध वॉर्डातून आठ इच्छुकांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे आता शहरात नगरपरिषद निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे. अनेक इच्छुक वार्डावार्डात चाचपणी करत फिरत असताना दिसत आहेत .
फोटो
वार्ड क्र ९ मधून राष्टवादी कॉंग्रेसकडून उमेदवारी मागणीचा अर्ज तालुका अध्यक्ष प्रकाश चवरे यांना देताना संतोष सुरवसे, आण्णा फडतरे, दाजी गाढवे आदी.
----