आमदार राजेंद्र राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी नगरपालिकेचे पक्षनेते विजय न. राऊत व मॉर्निंग ग्रुपच्या सदस्यांनी गेल्या पाच वर्षांपासून राऊत चाळ व परिसरात पाच हजार रोपांची लागवड केली, आज त्यांचे मोठ्या वृक्षांत रूपांतर झाले आहे.
याप्रसंगी मॉर्निंग सोशल फाउंडेशनने केवळ झाडे लावली नाहीत, तर ती चांगल्या स्थितीत वाढवून दाखविली. त्यांचे हे काम निश्चितच कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी काढले.
यावेळी आमदार राजेंद्र राऊत, तहसीलदार सुनील शेरखाने, उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजीत धाराशिवकर, उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील, विभागीय वनाधिकारी ल.व्ही.आर. शिंदे, ज्येष्ठ पत्रकार राजा माने, पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी, गटविकास अधिकारी शेखर सावंत, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता सौरभ होनमुटे, नगराध्यक्ष ॲड. आसिफभाई तांबोळी, फाउंडेशनचे अध्यक्ष विजय राऊत, मर्चंट असो.चे अध्यक्ष बाबासाहेब कथले उपस्थित होते.
वृक्षलागवड चळवळीसाठी सुमारे ८० हजार रुपये देणगी जमा झाली. या देणगीदारांच्या वतीने प्रतिनिधिक स्वरूपात रवींद्र राऊत यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन सचिन उकिरडे व मंगेश दहीहांडे यांनी केले, तर आभार उपाध्यक्ष डॉ. हरीश कुलकर्णी यांनी मानले.
----
फोटो : ०२ बार्शी :
बार्शी येथे आठ हजार झाडांचा वाढदिवस करताना उपस्थित मान्यवर
फोटो : ०२ बार्शी १ :
बार्शी येथे पाच हजार वृक्षलागवडीच्या शुभारंभप्रसंगी उपस्थित मान्यवर.
020721\1906img-20210702-wa0039.jpg~020721\1906img-20210702-wa0043.jpg
मॉर्निंग फाउंडेशन ने केवळ झाडे लावलीच नाहीत तर ती जगवून दाखवली- हेमंत निकम
आठ हजार झाडांचा वाढदिवस करून पाच हजार लागवडीचा शुभारंभ~मॉर्निंग फाउंडेशन ने केवळ झाडे लावलीच नाहीत तर ती जगवून दाखवली- हेमंत निकम
आठ हजार झाडांचा वाढदिवस करून पाच हजार लागवडीचा शुभारंभ