सांगोला तालुक्यात ६१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर विविध दाखल्यांसाठी कर भरणे अनिवार्य होते. यातून तालुक्यात घरपट्टीतून ४४ लाख ८३ हजार ३४० रुपये; तर पाणीपट्टीतून ३८ लाख ३१ हजार १४७ रुपये असा एकूण ८३ लाख २४ हजार ४८७ रुपये विविध करांपोटी उत्पन्न जमा झाल्याचे गटविकास अधिकारी संतोष राऊत स्पष्ट केले. जे कधी ग्रामपंचायतीकडे कर भरण्यासाठी फिरकले नव्हते, परंतु निवडणुकीत उभे राहण्यासाठी कर भरलेले प्रमाणपत्र अनिवार्य असल्यामुळे अशा उमेदवारांकडून करापोटी चालू व थकबाकी जमा झाली. याचा भार पॅनलप्रमुखांनी सोसला. त्यामुळे निवडणुकीतील ६१ व उर्वरित १५ अशा ७६ ग्रामपंचायतींकडे लाखो रुपये करापोटी जमा झाले आहेत.
असा जमला गावनिहाय महसूल
अचकदाणी २ लाख ८०,४४३, आगलावेवाडी १ लाख १०,२२६, अजनाळे १ लाख ६९, ३९६, अकोला २ लाख ३,९१०, आलेगाव १ लाख २९ हजार ४७४, अनकढाळ २८ हजार ८००, बागलवाडी ३४ हजार, बलवडी १ लाख २८ हजार ४८०, बामणी ७७ हजार १३७, भोपसेवाडी १ लाख ३ हजार, बुद्धेहाळ ८९ हजार ०६०, बुरंगेवाडी ५९ हजार ९५०, चिकमहूद ७२ हजार ८१०, चिणके ७ हजार ४६४, चिंचोली २० हजार ४९०, चोपडी १ लाख १५ हजार ०७०, देवळे ६३ हजार ५२०, धायटी ४७ हजार १६०, डिकसळ ८३ हजार ९७०, डोंगरगाव १ लाख ७ हजार ८३०, एखतपूर २ लाख ५५ हजार ०९६, गायगव्हाण ४९ हजार ७८०, गळवेवाडी २७ हजार ३११, घेरडी २ लाख ५७ हजार ०४७, गौडवाडी ३२ हजार ४४०, हटकर मंगेवाडी ७० हजार १५०, हलदहिवडी ५४ हजार ६००, हगिरगे २ लाख ४० हजार ४२०, हणमंतगाव १८ हजार ०१०, हातीद १ लाख ७८ हजार ३५०, इटकी ५२ हजार १०३, जवळा २ लाख ५० जार ९४१, जुजारपूर १ लाख ११ हजार ९६९, जुनोनी २ लाख २५ हजार ५१६, कडलास ३ लाख ३४ हजार २६६, कमलापूर १ लाख ६० हजार ३७४, कटफळ १ लाख २३ हजार ७००, खवासपूर ९३ हजार १००, खिलारवाडी ४६ हजार ३४६, किडेबिसरी ७९ हजार ७४३, कोळा ५ लाख ९ हजार ६५५, लक्ष्मीनगर १ लाख ७० हजार ५००, लोणविरे १ लाख २४ हजार ३७७७, लोटेवाडी १ लाख २७ हजार ८६६, महिम १ लाख १० हजार १९१, महूद ४ लाख ८७ हजार ०६९, मानेगाव १ लाख २७ हजार ३९६, मांजरी १ लाख ७० हजार २४०, मेडशिंगी २० हजार ६२७, मेथवडे ४६ हजार ९०३, नराळे ६० हजार ६६५,नाझरे ४ लाख ९८ हजार २८२, निजामपूर ४० हजार ४४५, पाचेगाव बुद्रुक ४२ हजार ४४१, पाचेगाव खुर्द १ लाख १३ हजार ८१०, पारे १ लाख १ हजार १०६, राजापूर ११ हजार ८००, राजुरी ८४ हजार ८५२, संगेवाडी १ लाख ७ हजार ४१०, सावे ८८ हजार ७१०, शिरभावी २ लाख १ हजार ४६०, शिवणे ९२ हजार ६९०, सोमेवाडी ५५ हजार ९५०, सोनलवाडी १८ हजार ५८३, सोनंद १४ हजार ५२०, तरंगेवाडी ८४ हजार ५६२, तिप्पेहळी ७९ हजार १७०, उदनवाडी १ लाख ६१ हजार ९८६, वझरे १ लाख १६ हजार १७०, वाढेगाव ५१ हजार ८६६, वाकी शिवणे १ लाख १ हजार ५२८, वाकी घेरडी १ लाख ३४ हजार ९५०, वाणीचिंचाळे १ लाख ९३ हजार ४०१, वासूद २ लाख ११ हजार ५९०, वाटंबरे १ लाख ६४ हजार ५१९, यलमार मंगेवाडी १ लाख ९१ हजार ७५०, असे एकूण ७६ ग्रामपंचायतीला एकूण सुमारे ८३ लाख २४ हजार ४८७ रुपये करापोटी जमा झाल्याचे गटविकास अधिकारी संतोष राऊत यांनी सांगितले.