शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
तेलंगणा सरकारने अदानी समूहाची १०० कोटींची देणगी नाकारली, कारण...
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
4
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
5
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
6
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
7
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
8
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
9
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
10
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
11
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
12
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
13
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
14
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
15
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
16
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
17
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
18
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
19
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
20
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."

मराठा समाज सेवा मंडळाची निवडणूक अविरोध

By admin | Published: May 23, 2014 1:06 AM

पिता-पुत्राची सत्ता : १२ जुने तर ४ नवे चेहरे

सोलापूर : येथील मराठा समाज सेवा मंडळाची निवडणूक अविरोध झाली असून त्याची औपचारिक घोषणा रविवारी केली जाणार आहे. मंडळावर सपाटे पिता-पुत्राची सत्ता आली आहे. शिक्षण क्षेत्रात नावलौकिक मिळविलेल्या मराठा समाजसेवा मंडळाची १५ जागांसाठी ५५ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. आज गुरुवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी ४० जणांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने १५ जणांचेच अर्ज राहिले. येत्या रविवारी यासाठी मतदान होणार होते. पण अर्ज मागे घेण्याच्या दिवशीच ही निवडणूक अविरोध झाली आहे. याची औपचारिक घोषणा रविवारी केली जाणार आहे. मराठा समाज सेवा मंडळाच्या बैठकीत विद्यमान अध्यक्ष मनोहर ्रसपाटे यांना उमेदवार निवडीचे सर्वाधिकार देण्यात आले होते. त्यांनी विद्यमान चांगदेव इगळे, लता जाधव व मधुकर इंगोले यांना डच्चू दिला तर नारायण शिंदे या संचालकाचे निधन झाले. त्यामुळे या चार जागांवर नवे चेहरे घेण्यात आले आहेत. यामध्ये सपाटे यांनी त्यांचे चिरंजीव अ‍ॅड. बाबासाहेब सपाटे यांची वर्णी लावली आहे. अविरोध निवडण्यात आलेले पदाधिकारी व संचालक याप्रमाणे, अध्यक्ष- मनोहर सपाटे, उपाध्यक्ष- अ‍ॅड. सुभाष साळुंके, सरचिटणीस- प्रा. महेश माने, चिटणीस- विनायक पाटील, खजिनदार- निवृत्ती केत, संचालक - अ‍ॅड. दादासाहेब देशमुख, हणमंतु बेसुळके, मोहन गोरे, नागनाथ डिगे, शहाजी सुर्वे गुरुजी, अ‍ॅड. दत्तात्रय पवार. हे सर्व विद्यमान सदस्य आहेत. नव्याने घेण्यात आलेले संचालक याप्रमाणे अ‍ॅड. बाबासाहेब सपाटे, नामदेव थोरात, हरिश्चंद्र बचुटे. महिला संचालिका- सुशीला शिंदे.

-------------------------

१९९३ पासून सपाटे यांचे वर्चस्व ४सोलापुरात मराठा समाज सेवा मंडळाच्या अधिपत्याखाली मोठा शिक्षणविस्तार झाला आहे. या मंडळावर १९९३ पासून माजी महापौर मनोहर सपाटे यांचे वर्चस्व आहे. मागील निवडणुकीमध्ये सपाटे यांना त्यांच्या विरोधकांनी हैराण केले होते. पण या खेपेस त्यांच्या विरोधकांनी तलवार म्यान केल्याने सपाटेंच्या नेतृत्वाखाली मंडळाची निवडणूक अविरोध झाली आहे.