शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपची मोठी घोषणा! मुंबईत मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा; पूर्ण ताकदीने प्रचार करणार
2
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
3
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
5
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
6
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
7
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
8
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
11
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
12
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
13
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
14
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
15
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
16
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
17
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
18
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
19
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
20
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या

ऐन उन्हात सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा धगाटा; १,५४६ सहकारी संस्थांचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2022 5:33 PM

बँका, शिक्षक पतसंस्था, साखर कारखान्यांचा समावेश

सोलापूर : जिल्ह्यातील साखर कारखाने, सूत गिरण्या, दूध संघ, बँका, दूध संस्था व हाॅस्पिटल अशा १,५४६ सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा बार मे महिन्यात उडणार आहे. एका वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात सहकारी संस्थांच्या निवडणुका पहिल्यांदाच होत आहेत. अगोदरच कडक उन्हाळा असताना, निवडणुकामुळे जिल्ह्यातील वातावरण आणखी गरम होणार आहे.

अगोदर कर्जमुक्ती योजनेसाठी कर्मचारी गुंतल्याने, तर नंतर कोरोनामुळे राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. मात्र, या निवडणुका मागील तीन महिन्यांपासून सुरू आहेत. २०१९, २०२०मध्ये मुदत संपलेल्या काही संस्थांच्या निवडणुका पार पडल्या असून, काही संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत. काही संस्थांची मुदत संपली असली, तरी संस्थांकडून मतदार याद्या आल्या नसल्याने प्रशासक व अवसायक नेमले आहेत.

चौथ्या, पाचव्या व सहाव्या टप्प्यांतील निवडणुका आता एकाच टप्प्यात घेण्याच्या सूचना निवडणूक प्राधिकरणाने दिल्या आहेत. तीन टप्प्यांतील १,५४६ सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, मतदार याद्या मागविण्यात आल्या आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर सहकारी संस्थांच्या निवडणुका प्रथमच होत आहेत.

  • भीमा सहकारी टाकळी सिकंदर, संत दामाजी मंगळवेढा, संत कुर्मदास, विठ्ठल गुरसाळे, स्वामी समर्थ साखर कारखाना अक्कलकोट
  • * स्वामी समर्थ सूत गिरणी वळसंग, वसंतराव नाईक सूत गिरणी, शेतकरी सहकारी सूत गिरणी सांगोला, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर सूत गिरणी सावळेश्वर, शिवामृत सहकारी दूध संघ अकलूज.
  • * जिल्हा प्राथमिक शिक्षक पतसंस्था, माध्यमिक शिक्षक सहकारी पतसंस्था, जिल्हा मध्यवर्ती बँक कर्मचारी पतसंस्था, शिवशंकर ग्राहक भांडार, मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालय.
  • * रुक्मिणी बँक, पंढरपूर मर्चंट बँक, सांगोला अर्बन बँक, कृषिसेवा अर्बन बँक, सिद्धेश्वर बँक, जनता बँक कुर्डूवाडी, पंढरपूर अर्बन बँक, राजमाता बँक, लोकमंगल बँक, महेश बँक, लक्ष्मी बँक, शरद बँक , निधीगंधा बँक आदी १,५४६ संस्थांच्या निवडणुका होणार आहेत.

 

२०१९ व २०२० मध्ये मुदत संपलेल्या जिल्ह्यातील पात्र सहकारी संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होत आहे. काही संस्थांवर अवसायक नेमले आहेत. २०२१ व मार्च २२ पर्यंत मुदत संपणाऱ्या संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू करायची आहे.

- कुंदन भोळे, जिल्हा उपनिबंधक सोलापूर.

 

टॅग्स :SolapurसोलापूरElectionनिवडणूकPoliticsराजकारण