सरपंच पदासाठी काळे गटाकडून सारिका चंदनशिवे व परिचारक गटाकडून वसंतराव चंदनशिवे तर उपसरपंच पदासाठी दोन अर्ज आल्याने निवड प्रक्रिया पार पडली. यामध्ये सरपंच सारिका चंदनशिवे व उपसरपंच उमा मेटकरी यांना सहा मते मिळवून विजयी झाल्याचे निवडणूक अध्यासी अधिकारी एस. ए. शिंगाडे, ग्रामसेवक बाबासाहेब नरळे यांनी जाहीर केले.
यावेळी नूतन सदस्य दत्तात्रय खरात, बाबासाहेब हाके, शामल पाटील, मनीषा गोफणे, जनाबाई हाके, वसंत चंदनशिवे, नंदाबाई कोळेकर, आक्काताई खरात, वैशाली पगारे यांच्यासह सहकार शिरोमणीचे संचालक भारत कोळेकर, मच्छिंद्र पाटील, गोरख महारनवर, पाटलू पाटील, जालिंदर गोफणे, शिवाजी खरात, हणमंत मेटकरी, भारत पडळकर, भागवत महारनवर, सत्यवान पाटील, रामचंद्र कोळेकर, नवनाथ कोळेकर, भीमराव गायकवाड, नामदेव सलगर, सीताराम कोळेकर, रत्नाकर शेळके, हणमंत कोळेकर, समाधान महारनवर, याकुब मुलाणी, अभिमान चंदनशिवे, सर्जेराव महारनवर, शिवाजी बनसोडे, तानाजी गोफणे, शिवाजी बनसोडे, बाळासो मेटकरी, संभाजी शिंदे, रावजी शिंदे, राजू चंदनशिवे, लालासो खरात, सलिम मुलाणी आदी उपस्थित होते.
फोटो :::::::::::::::
सरपंच सारिका चंदनशिवे, उपसरपंच उमा मेटकरी व नूतन ग्रामपंचायत सदस्य आदी उपस्थित होते.