सोलापूर : सोलापूर बार असो.ची सन २०१८-१९ ची निवडणूक जाहीर झाली असून, उमेदवारी अर्जांच्या छाननीत सर्व अर्ज मंजूर झाले. सहसचिवपदासाठी दाखल केलेला उमेदवारी अर्ज अॅड. एन. डी. मुलवाड यांनी मागे घेतला तर निवडणूक निर्णय अधिकारी अॅड. एच.एम. अंकलगी यांनी उमेदवारांची अतिम यादी प्रसिध्द केली आहे.
यंदाच्या निवडणुकीसाठी तीन पॅनल जाहीर झाले असून, या निवडणुकीत विधिविकास पॅनलकडून अध्यक्षपदासाठी अॅड. संतोष वि. न्हावकर, उपाध्यक्षसाठी अॅड. व्ही. वाय. पांढरे, सचिवसाठी अॅड. रियाज शेख, खजिनदारसाठी अॅड. तानाजी शिंदे, सहसचिवपदासाठी अॅड.स्वप्नाली चालुक्य तर जनसेवा पॅनलमधून अध्यक्षपदासाठी अॅड. सुरेश गायकवाड, उपाध्यक्षसाठी अॅड. शिरीष नंदीमठ, सचिवसाठी संजय मंटगे, खजिनदारसाठी अॅड. दयानंद माळी यांनी उमेदवारी जाहीर केली आहे. तिसरे पॅनल विधिसेवा असून, यात अध्यक्षपदासाठी अॅड. राजेंद्र फताटे, उपाध्यक्षसाठी संतोष पाटील, सचिवपदासाठी अॅड. संतोष होसमनी, खजिनदारसाठी अॅड. महेंद्र वड्डेपल्ली, सहसचिवपदासाठी अॅड. शाहीन एम. डी., जलील शेख यांनी उमेदवारी दाखल केली आहे तर अॅड. डी.बी. आगासे यांनी अध्यक्षपदाकरिता उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
१६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात - सोलापूर बार असोसिएशनच्या निवडणुकीसाठी सोमवारी सकाळी ८ ते ४ वाजेपर्यंत बार असोसिएशनच्या हॉलमध्ये मतदान होणार आहे. यात १ हजार १३४ मतदार आहेत. अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी प्रत्येकी चार उमेदवार, सेक्रेटरी (सचिव)पदाकरिता तीन उमेदवार, सहसचिवपदासाठी दोन तर खजिनदारसाठी तीन असे एकूण १६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.