करमाळा : तालुक्यातील उजनी जलाशय खातगाव नं. १ येथून जिंती येथील शेतक-याची विद्युत मोटार चोरीला गेली असल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शेतक-याच्या तक्रारीवरुन करमाळा पोलिसांनी मंगळवारी गुन्हा दाखविला आहे. पांडुरंग संभाजी धापटे (वय ४१, रा. आंथुर्णे, ता. इंदापूर, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलीस सूत्राकडील माहितीनुसार जिंती (ता. करमाळा) येथे शेतीसाठी लागणा-या पाण्यासाठी खातगाव नं. १ येथून उजनी जलाशयातून पाईपलाईन केली आहे. त्यासाठी ५ एचपीची मोटार बसवली आहे. शेतात काम करणारा मजूर संजय रंगनाथ चव्हाण (रा. धालवडी, ता. कर्जत जि. अहमदनगर) हे नेहमी पाण्याची मोटार सुरु करण्यासाठी जात असे. चव्हाण यांनी ९ जुलै रोजी सायंकाळी मोटार सुरु केली होती. तर ११ जुलै रोजी सकाळी मोटार तेथे नव्हती.