मंगळवेढा तालुक्यांतर्गत मंगळवेढा शहर, मंगळवेढा ग्रामीण, बोराळे, आंधळगाव, मरवडे, निंबोनी अशा सहा शाखा आहेत. या सहा शाखांमध्ये २५ हजार १५० वीज ग्राहक आहेत. २२ हजार २३० घरगुती वीज ग्राहकांपैकी १९ हजार ५८६ ग्राहकांनी अद्याप बिले भरली नाहीत. त्यांच्याकडे ६ कोटी २४ लाख रुपये थकबाकी आहे. व्यापारी ग्राहक १८०० असून यामध्ये १७३६ ग्राहकांकडे १ कोटी २४ लाख थकीत आहेत. व्यावसायिक ग्राहक ८०० असून यामध्ये ४०० ग्राहकांकडे ९९ लाख १७ हजार रुपये थकबाकी आहे.
सरकारी कार्यालये १७७ ग्राहक असून एकाही सरकारी कार्यालयाने वीज बिल भरले नाही. त्यांच्याकडे १९ लाख १० हजार थकबाकी आहे. पाणीपुरवठ्याच्या १४३ ग्राहकांकडे २ कोटी ५ लाख १५ हजार थकबाकी आहे तर शेतीपंपाच्या २१ हजार ९८७ ग्राहकांकडे २३ कोटी २१ लाख ६८ हजार रुपये थकबाकी आहे.
वीज कंपनीशी अनेक ग्राहकांचे भ्रमणध्वनी नंबर नोंद झालेले आहेत. त्या सर्वांना विजेच्या थकीत असलेल्या बिलाच्या नोटिसा, एसएमएस पाठविले आहेत. दहा महिन्यांपासून कोरोना संसर्गामुळे वसुली मोहीम झाली नाही. थकीत वीजबिलांमुळे महावितरणला मोठे आर्थिक नुकसान होत असल्याने वसुलीसाठी धडक मोहीम सुरू झाली आहे. या आठवड्यात महावितरणने घरगुती १२८५, व्यापारी ३७, औद्योगिक २६, पाणी पुरवठा ५८, रस्ता दिवाबत्ती ५२ कनेक्शन कट केली आहेत.
कोट ::::::::::::::::::
कोरोना संकटामुळे आठ ते दहा महिन्यांपासून अनेक ग्राहकांनी वीजबिल भरलेले नाही. त्यामुळे महावितरणला मोठी आर्थिक झळ सोसावी लागत आहे. ग्राहकांनी थकीत बिल त्वरित भरून वीज कनेक्शन तोडण्याचा प्रसंग महावितरणवर येऊ देऊ नये.
- संजय शिंदे
उपकार्यकारी अभियंता, मंगळवेढा