आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २४ : थकबाकी व चालू वीजबिलांचा वीजग्राहकांना भरणा करता यावा म्हणून महावितरणची जिल्ह्यातील सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्रे २५ व २६ नोव्हेंबर रोजी सुटीच्या दिवशी सुरू राहणार आहेत.जिल्ह्यात घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वीजग्राहकांकडून थकबाकी वसूल करण्यासाठी 'शून्य थकबाकी मोहीम' वेगात सुरू आहे. यात बिलांचा भरणा न केल्यास थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची धडक कारवाई सुरू आहे. त्यामुळे थकीत देयकांचा भरणा करणे सोयीचे व्हावे, यासाठी शनिवारी (दि. २५) व रविवारी (दि. २६) सार्वजनिक सुटी असली तरी सोलापूर जिल्ह्यातील महावितरणची सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्रे कार्यालयीन वेळेत सुरू राहणार आहेत.याशिवाय चालू व थकीत वीजबिलांचा भरणा करण्यासाठी अधिकृत वीजबिल भरणा केंद्रांसह महावितरणची वेबसाईट तसेच मोबाईल अॅपद्वारे 'आॅनलाईन' सोय उपलब्ध आहे. ग्राहकांनी संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी चालू देयकांचा मुदतीत व मागील महिन्यांतील थकबाकीचा त्वरित भरणा करावा व वीजपुरवठा खंडित करण्याची नामुष्की टाळावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.
सुट्टीच्या दिवशीही वीजबिल भरणा केंद्रे सुरू राहणार, महावितरणची व्यवस्था !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 11:16 AM
थकबाकी व चालू वीजबिलांचा वीजग्राहकांना भरणा करता यावा म्हणून महावितरणची जिल्ह्यातील सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्रे २५ व २६ नोव्हेंबर रोजी सुटीच्या दिवशी सुरू राहणार आहेत.
ठळक मुद्देथकबाकी वसूल करण्यासाठी 'शून्य थकबाकी मोहीम' वेगात सुरूथकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची धडक कारवाई सुरूथकीत देयकांचा भरणा करणे सोयीचे व्हावे थकबाकीचा त्वरित भरणा करावा व वीजपुरवठा खंडित करण्याची नामुष्की टाळावी