या वेळी प्रांताधिकारी ज्योती कदम, तहसीलदार राजेश चव्हाण, गटविकास अधिकारी डॉ. संताजी पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवाजी थोरात, नगरपालिकेचे मुख्याधिकारी समीर भूमकार यांच्यासह अकुलगावच्या सरपंच जयश्री बोबडे, उपसरपंच सुनील नरुटे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
या वेळी जिल्हाधिकारी म्हणाले, गृह विलगीकरणामध्ये असलेले बरेचसे कोविड रुग्ण हे विलगीकरणाचे नियम पाळत नाहीत. त्यामुळे होम क्वारंटाईन बंद करून प्रत्येक गावात संस्थापक अलगीकरण व कोविड केअर सेंटर सुरू करावे. तसेच पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढविण्यावर संबंधित अधिकाऱ्यांनी भर द्यावा. अकुलगाव येथे एका दिवसात १० रुग्ण पॉझिटिव्ह आढळले होते. आत्तापर्यंत ही संख्या ५६ वर पोहोचली असून, ४०० कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्यात आलेले आहेत. त्यामुळे गावातील शाळेमध्येच आयसोलेशन सुरू करून, ११ रुग्णांना त्यात दाखल करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या वेळी जिल्हाधिकारी यांनी माढा तालुक्याचा आढावा घेऊन मार्गदर्शक सूचना अधिकाऱ्यांना केल्या.
फोटो
अकुलगाव (ता. माढा) येथे ग्रामस्तरीय बैठकीत अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर. या वेळी प्रांताधिकारी ज्योती कदम व अधिकारी उपस्थित होते.
----