बार्शी : तालुक्यात खरीप हंगामातील पिकांची लागवड वाढली आहे. सोयाबीन व तूर या पिकाचे जास्त उत्पादन देणारे वाण तालुक्यामध्ये लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करा, अशा सूचना आमदार राजेंद्र राऊत यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
याशिवाय बार्शी तालुक्यात कांद्याचे मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन होत आहे. त्यामुळे कृषी विभागांतर्गत कांदा चाळीची फवारणी करण्यासाठी शासन स्तरावरून पाठपुरावा करू अशी ग्वाही त्यांनी दिली.
तुळजापूर रोडवरील बाजार समितीच्या सभागृहात खरीप हंगाम पूर्वतयारी या विषयावर आयोजित आढावा बैठकीत आमदार राऊत यांनी सूचना केल्या. यावेळी पंचायत समितीचे सभापती अनिल डिसले, तालुका कृषी अधिकारी शहाजी कदम, मंडळ कृषी अधिकारी दिलीप राऊत, कृषी अधिकारी नानासाहेब लांडगे, कृषी पर्यवेक्षक गुणनियंत्रण विभाग गणेश पाटील, कृषी पर्यवेक्षक विलास मिस्कीन, सुधीर काशीद, भारत दाईंगडे, अमोल गायकवाड, प्रशांत नलावडे, प्रसेनजित जानराव, कृषी निविष्ठा पुरवठादार बाप्पा कोकाटे, दिनेश सुपेकर, राहुल मुंडे, उमेश चव्हाण, कांतीलाल मुनोत, अतुल झिंजुर्डे, सचिन चव्हाण, नाना मते, सोनू कदम, प्रमोद मालपाणी उपस्थित होते.
कृषी पर्यवेक्षक गणेश पाटील यांनी द्राक्षाचे वाढते क्षेत्र विचारात घेऊन बार्शी तालुक्यात द्राक्षासाठी कोल्ड स्टोअरेज उभारण्याचा प्रकल्प राबविण्याची मागणी केली.
प्रास्ताविक कृषी पर्यवेक्षक बाळासाहेब चापले यांनी केले. कोरोना काळात योग्य नियोजन केल्याबद्दल कृषी दुकानदारांच्या वतीने कृषी अधिकारी शहाजी कदम यांचा सत्कार केला.
---
बांधावर जाऊन बियाणे, खते वाटप करा
दुकानातील गर्दी टाळण्यासाठी खत विक्रेत्यांनी नेहमीच्या शेतकऱ्यांशी संपर्क साधून बांधावर जाऊन बी-बियाणे, खते वाटप करण्याचे नियोजन करावे. खत विक्रेते व कृषी विभागाचे अधिकारी यांनी समन्वय साधून वाटप करावे अशा सूचनाही आमदार राजेंद्र राऊत यांनी दिल्या.
---
वैरागमध्ये कोल्ड स्टोअरेज उभारणार
साठवणुकीत कांदा जास्त दिवस टिकविण्यासाठी कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना रासायनिक खते फवारणी, खबरदारी याबद्दल अभ्यास करून अंमलबजावणी करावी. तालुक्यातील द्राक्ष उत्पादनात मोठ्या प्रमाणामध्ये होणारी वाढ लक्षात घेता तालुक्यांत कृषी विभागामार्फत बेदाणा निर्मितीसाठी बेदाणा शेड उभारणी करण्यासाठी शासकीय अनुदान देण्याच्या सूचना केल्या. तयार बेदाणा बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीची उपशाखा वैराग येथे साठवणुकीसाठी कोल्ड स्टोअरेज उभारण्याचे निश्चित केल्याचे आमदार राऊत यांनी सांगितले.
---
===Photopath===
060621\4425img-20210606-wa0014.jpg
===Caption===
कृषी उत्पन्न बाजार समिती तुळजापूर रोड बार्शी येथील सभाग्रहात खरीप हंगाम पूर्वतयारी या विषयावर आयोजित आढावा बैठकीत बोलताना आमदार राजेंद्र राऊत