शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
3
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
4
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
5
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
6
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
7
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
8
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
9
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
10
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
11
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
12
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
13
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
14
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
15
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
16
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
17
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
18
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
19
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
20
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."

‘तरूण भारत श्री’ स्पर्धेला अखेर मुहूर्त

By admin | Published: January 02, 2015 10:51 PM

पुन्हा प्रारंभ: सात जानेवारीला आयोजनर्

आदित्यराज घोरपडेल्ल सांगलीराज्यभर नावारूपास आलेल्या ‘तरूण भारत श्री’ या मानाच्या शरीरसौष्ठव स्पर्धेस तब्बल आठ वर्षानंतर मुहूर्त सापडला आहे़ ७ जानेवारी २०१५ या तारखेवर शिक्कामोर्तब झाले असून, याबाबत संचालक मंडळाची सभाही झाली आहे़ तेरावी तरूण भारत श्री स्पर्धा धुमडाक्यात पार पाडण्यासाठी जोरदार ‘फिल्डींग’ लावण्यात आली आहे़गेल्या आठ वर्षापासून विविध कारणांमुळे ही शरीरसौष्ठव स्पर्धा बंद पडली होती़ दोन वर्षांपूर्वी मंडळाची निवडणूक झाली़ वर्षानुवर्षाच्या सत्तेला खिंडार पडले़ मंडळात सत्तांतर झाल्यानंतर विद्यमान संचालक मंडळाने राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा घेवून सांगलीला कबड्डीमय केले़ ‘कहो दिलसे़़क़बड्डी फिरसे’चा नारा राज्यभर घुमला़ माजी मंत्री मदन पाटील यांनी ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विशेष लक्ष घातलं होतं़ त्यांच्याच मार्गदर्शनाखाली बंद पडलेली ‘तरूण भारत श्री’ स्पर्धा सुरू करणार असल्याचं, मंडळाचे तत्कालिन अध्यक्ष शंकरराव दुदुस्कर यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं़ त्यादृष्टीनं त्यांनी प्रयत्नही सुरू केले होते़ मात्र दुर्देवाने त्यांचे निधन झाले़ प्रत्येक वर्षी जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ‘तरूण भारत श्री’ ही राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा व्हायची़ ११ वर्षापासून अखंडीतपणे स्पर्धा सुरू होती. मात्र २००६ मध्ये ही स्पर्धा बंद पडली़ राज्यभरातून या स्पर्धेसाठी मातब्बर शरीरसौष्ठवपटू दाखल व्हायचे़ प्रत्येक वर्षी जानेवारी महिन्याचा पहीला रविवार म्हणजे ‘तरूण भारत श्री स्पर्धा’ हे समिकरण राज्याच्या क्रीडा क्षेत्रात सर्वांना तोंडपाठ झालेलं़ १९९४ मध्ये ही स्पर्धा सुरू झाली होती़ अनिल राऊत, मंदार चवरकर व सुहास खामकर यांनी दोन वेळा तरूण भारत श्री किताब मिळवण्याचा करिष्मा केला होता़का बंद पडली स्पर्धा?महाराष्ट्रात सध्या दोन राज्य शरीरसौष्ठव संघटनाआहेत. त्यामुळे स्पर्धा कोणत्या संघटनेच्या मान्यतेने घ्याव्यात हा प्रश्न संयोजकांना पडतो. म्हणूनच गेल्या आठ वर्षांपासून या स्पर्धा बंद आहेत. संजय मोरे (औरंगाबाद) यांची महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स असोसिएशन व मधुकर तळवळकर (मुंबई) यांची महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशन यांच्यात सातत्याने धुसफूस सुरू आहे़ ‘तरूण भारत श्री’ विजेते़१९९४ : प्रकाश कोयंडे (मुंबई)१९९५ : रवींद्र आरते (सांगली)१९९६ : श्रीकांत बंगेरा (मुंबई )१९९७ : अनिल राऊत (मुंबई)१९९८ : अनिल राऊत (मुंबई)१९९९ : श्याम रहाटे (मुंबई)२००० : संदीप वालावलकर (मुंबई)२००१ : मंदार चवरकर (मुंबई)२००२ : प्रकाश घाडगे (मुंबई)२००३ : एम़ एस़ मोहनन (सेनादल)२००४ : मंदार चवरकर (मुंबई)२००५ : सुहास खामकर (कोल्हापूर)२००६ : सुहास खामकर (कोल्हापूर)