शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar: आर. आर. पाटलांवर गंभीर आरोप; वाद चिघळल्यानंतर अजित पवार म्हणाले...
2
"दाऊदशी संबंध जोडणाऱ्यांना नोटिस बजावणार’’, भाजपा नेत्यांना नवाब मलिकांचा इशारा 
3
अमित ठाकरेंना घेरण्याची 'उद्धव'निती; थेट मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना लिहिलं पत्र
4
'शरद पवार कुटुंब फुटू देणार नाहीत', छगन भुजबळांचं विधान
5
पडद्यामागून भाजपाची वेगळीच 'रणनीती'?; मागील निवडणुकीपेक्षा जास्त उमेदवार रिंगणात
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : ढसा ढसा रडले, १०० तासानंतर घरी परतले, कुठे गेले, कोणाला भेटले, श्रीनिवास वनगांनी काय सांगितलं?
7
एकेकाळी घराघरात कलर टीव्ही पोहोचविणाऱ्या BPL कंपनीच्या संस्थापकांचे निधन; टीपी गोपालन नांबियार काळाच्या पडद्याआड
8
'तेव्हा' आदित्यसाठी राज ठाकरेंना पाठिंबा मागितला नव्हता; महेश सावंत यांचा खोचक टोला
9
IND vs NZ : रोहित-विराट यांना काही वेळ द्या, ते मेहनत घेत आहेत - अभिषेक नायर
10
महाराष्ट्रात फक्त 'इतक्या' जागांवर AIMIM चे उमेदवार; काय आहे ओवेसींची रणनिती? पाहा...
11
काँग्रेसला आणखी धक्के बसणार? देवेंद्र फडणवीसांनी सगळेच सांगितले; म्हणाले, “आताच नावे...”
12
"वर्षा गायकवाड आणि त्यांच्या पतीने काँग्रेस विकली"; रवी राजांनंतर आणखी एका नेत्याचा गंभीर आरोप
13
बापरे! तरुणाने मोबाईल खिशात ठेवला अन् भयंकर स्फोट झाला, गंभीररित्या भाजला
14
IND vs NZ : भारताच्या पराभवानंतर अखेर गौतम गंभीरनं सोडलं मौन; टीम इंडियाच्या 'हेड'ची रोखठोक मतं
15
"धर्म की पुनर्रस्थापना हो...!"; दिवाळी निमित्त पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तानातील हिंदूंना उद्देशून काय म्हणाले पवन कल्याण
16
समीकरण जुळले, आता ३ तारखेला जागा अन् उमेदवार ठरणार; मनोज जरांगेंची मोठी घोषणा
17
भारताचे 'जेम्स बाँड' अजित डोवाल यांची अमेरिकेशी महत्त्वाची चर्चा, देशाच्या सुरक्षेसंबंधी बोलणी
18
पीएम मोदींनी कच्छमध्ये जवानांसोबत साजरी केली दिवाळी, स्वतःच्या हाताने मिठाई खाऊ घातली
19
प्रचाराला जाताना ठाकरे गटाच्या उमेदवाराला आला हार्ट अटॅक; तातडीनं रुग्णालयात दाखल
20
जबरदस्त तिमाही निकालानंतर 'हा' शेअर सुस्साट; घसरत्या बाजारातही जोरदार तेजी

पांडुरंगाच्या दर्शनाला खुशाल जावा पण रस्त्याच्या उजव्या बाजूनं चाला

By विलास जळकोटकर | Published: March 27, 2023 7:11 PM

चैत्री वारीच्या निमित्ताने तमाम महाराष्ट्रातील वारकरी बांधव दिंड्यानिशी पंढरपूरकडे पायी चालत जातात.

सोलापूर : चैत्री वारीच्या निमित्ताने तमाम महाराष्ट्रातील वारकरी बांधव दिंड्यानिशी पंढरपूरकडे पायी चालत जातात. यंदा २८ मार्च ते ६ एप्रिल या काळात अनेक रस्त्यांवर हे चित्र दिसणार आहे. अंधाऱ्या रात्री अथवा दिवसा पाठिमागून येणाऱ्या वाहनांच्या धडकेमुळेअपघात होतात. म्हणून उजव्या बाजूने चालावे, यासाठी आरटीओ प्रशासनाकडून पथकांद्वारे सोमवारपासून प्रबोधन मोहीम सुरु करण्यात आली.

चैत्री वारीसाठी लाखो भाविक पंढरीत दाखल होतात. बरेच वारकरी हे पंढरपूरकडे पायी चालत येत असतात. बऱ्याचदा पायी चालणाऱ्या वारकऱ्यांच्या दिंडीमध्ये भरधाव वाहने घुसून अपघात झाले आहेत. यामध्ये अनेकांना जीवही गमवावा लागलेला आहे. संध्याकाळी अंधार पडल्यानंतर व भल्या पहाटे वाहनचालकांना गर्दीचा अंदाज येत नाही. तसेच वारकऱ्यांनाही पाठीमागून येणाऱ्या वाहनाचा अंदाज येत नाही.

यासाठी सोमवारी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील वायुवेग पथक क्रमांक १ मधील मोटार वाहन निरीक्षक प्रदीप बनसोडे,शिरीष तांदळे, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक अक्षय जाधव, विद्यादेवी जाधव, कार्यालयीन वाहन चालक शिवाजी गायकवाड यांना वाहनांची तपासणी करताना वारीतील सर्वच भाविक रस्त्याच्या डाव्या बाजूने पायी जात असल्याचे त्यांना आढळून आले. त्यावेळी त्यांनी सर्व भाविकांना रस्त्याच्या उजव्या बाजूने चालण्याबाबत मार्गदर्शन केले.पाच वायुवेग पथकाची नियुक्ती

यासाठी जनजागरण मोहीम राबवण्यासाठी यापुढे वारकऱ्यांची यात्रा सुरक्षित व विना अपघात होण्यासाठी, जीवित हानी टाळण्यासाठी चैत्र वारी निमित्त उप प्रा परिवहन कार्यालयाच्या वतीने ५ वायुवेग पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. या वायुवेग पथकामार्फत पायी चालणाऱ्या वारकऱ्यांना पहाटे तसेच संध्याकाळी अंधार पडल्यानंतर रस्त्याच्या उजव्या बाजूने चालण्यासाठीचे प्रबोधन करण्यात येणार आहे.सर्व भाविकांना चैत्र वारी निमित्त रस्त्याच्या उजव्या बाजूने चालण्यासाठी पाच वायुवेग पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या माध्यमातून उजव्या बाजूने चाला याबद्दल जनजागृती करण्यात येत आहे. नागरिकांनी ज्या ठिकाणी फूटपाथ नाहीत त्या ठिकाणी त्यांनी रस्त्याच्या उजव्या बाजूने चालावे.- अर्चना गायकवाड, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, सोलापूर