सोलापूर : शहरातील बहुतांश कंटेन्मेंट एरियात आज फेरफटका मारला असता कंटेन्मेंट एरियाची ऐशी की तैशी झाल्याचे जाणवले. कंटेन्मेंट एरियात ना पोलीस बंदोबस्त होता, ना आरोग्य कर्मचाºयांची वर्दळ. कोरोना रुग्ण आढळल्यानंतर त्या घरातील नागरिकांना एक तर होम क्वारंटाईन करतात किंवा इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करतात. संबंधित रुग्णाच्या घराला सील करतात. घर परिसरात कोणी येऊ नये यासाठी बांबू बांधून ठेवतात. एकदा हे काम झाले की त्या कंटेन्मेंट एरियाकडे ना पोलीस फिरकतात, ना आरोग्य कर्मचारी. मग तो कंटेन्मेंट परिसर म्हणजे ‘आवो जावो घर तुम्हारा’ असे होऊन जाते. कंटेन्मेंट एरियाबद्दल प्रशासन खूपच उदासीन आहे. याबद्दल नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनाने प्रतिबंधित क्षेत्रे निश्चित केलेली आहेत. एखाद्या गल्लीतील एखाद्या घरात जण कोणी कोरोना पॉझिटिव्ह झाला तर त्या घरावर प्रतिबंधित म्हणून फलक लावला जातो; पण त्या परिसरात जास्त रूग्ण असतील तर तो संपूर्ण परिसर कंटेन्टमेंट घोषित केला जातो.
जोडभावी पेठेत राजरोस वारसहा दिवसांपूर्वी जोडभावी पेठ परिसरातील व्यापारी बँक भागात तीन लोक बाधित निघाले. शिवाय जवळपास ३० लोक हे क्वारंटाईन आहेत. या भागातील स्टील कपाट बनवण्याची दुकाने ते इतर प्रकारची पाच-सात दुकाने ही चालूच आहेत. या कंटेन्मेंट झोनमधून बरेच लोक भाजीपाला, फळे, दूध अन् औषधे आणायला बाहेर पडताहेत. या झोनमध्ये लहान मुलांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. मैदान नसल्याने ही मुले अंतर्गत रस्त्यावर खेळ खेळतात, तेही मास्क न घालताच. इतकेच नव्हे तर बाहेर थांबलेल्या रिक्षातून झोनमधील लोक खरेदीसाठी बाजारपेठेत जातात. बाजार फि रून झाल्यानंतर झोनमध्ये परतात. या मुक्तसंचारातून एकमेकांचा सरळ संपर्क वाढत आहे. त्यामुळे कंटेन्मेंट झोन नावालाच राहिल्याची ओरड परिसरातील नागरिकांतून होत आहे.
- - पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेल्या ठिकाणी आरोग्य विभाग पोलीस व महसूल अधिकाºयांच्या मदतीने रुग्णांची हिस्ट्री काढून संबंधित लोकांना क्वारंटाईन केले जाते. त्याप्रमाणे महसूल अधिकारी प्रतिबंधित क्षेत्राची हद्द ठरवितात व त्या भागात बाहेरून कोणाला येऊ दिले जात नाही व आतील लोकांना बाहेर ये-जा करण्यास सक्त मनाई आहे.
- - रुग्णांचा संपर्क शोधण्यासाठी व क्वारंटाईन करण्यासाठी पोलिसांची मदत आवश्यक आहे. यासाठी प्रतिबंधित क्षेत्राला दोन किंवा एकच प्रवेशद्वार ठेवून बाकीचा भाग व रस्ते बांबू किंवा इतर साहित्यांचा वापर करून बंद केले जातात. प्रवेशद्वारावर पोलीस बंदोबस्त असतो.
- - एखादी व्यक्ती प्रतिबंधित क्षेत्रातून बाहेर जात असेल तर गरजेचे कारण असेल तर सोडले जाते. यामध्ये अन्न, औषध व उपचाराव्यतिरिक्त विनाकारण नागरिकांना घराबाहेर येण्यास मनाई आहे. या क्षेत्रात महसूल प्रशासनाने किराणा व इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करावा, असे नियमात आहे.
गांभीर्य कमीच..गीता नगर येथील न्यू पाच्छापेठ परिसरात एक घर बांबूंनी सील केले होते. तेथे यापूर्वी एक महिला पोलीस आणि एसआरपी पोलीस तैनात असल्याची माहिती त्या परिसरातील नागरिकांनी दिली. त्या कंटेन्मेंट परिसरात फेरफटका मारल्यानंतर पाचशे ते सहाशे मीटरपर्यंत एकही पोलीस दिसला नाही. एकूणच कंटेन्टमेंट झोनसंदर्भात कोणतेच गांभीर्य दिसून आले नाही.
बुधले गल्लीत राजरोस वावर
- - कोरोनाचा रुग्ण आढळल्यामुळे शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने बुधले गल्ली येथील एक भाग प्रतिबंधित करण्यात आला आहे. याठिकाणी समोरून रस्ता बंद करण्यात आला असला तरी पाठीमागील बाजूने लोकांची ये-जा असते. बंदोबस्तासाठी असलेले पोलीस काही वेळेसाठी इतरत्र गेले की मग बाहेरील लोकांना आतमध्ये जाण्यास मार्ग मोकळा होत असतो.
- - दोन महिन्यांपूर्वी मराठा वस्ती शिवगंगा मंदिर परिसरात कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यामुळे तो भाग पोलिसांनी सील केला होता. एक महिन्याच्या कालावधीनंतर तेथील सील काढण्यात आले, मात्र याच परिसरात असलेल्या बुधले गल्लीमध्ये एक रुग्ण आढळून आला. या भागात जाणारा रस्ता पोलिसांनी बंद केला आहे.