सोलापूर - सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रवेशव्दारावर चाचणी करूनच अभ्यासगताना प्रवेश दिला जात आहे. त्यात सोमवारी सकाळी आलेला पहिला व्हिजिटरच कोरोना पॉझिटिव्ह निघाला आहे. जिल्हा परिषदेत कामानिमित्त येणार्यांना कोरोना चाचणीनंतर प्रवेश दिला जात आहे. सोमवारी सकाळी दहा वाजता प्रवेशव्दाराजवळ आलेला पहिला व्हिजिटर तपासणी केल्यावर पॉझिटिव्ह आला. साेलापुरातील रामवाडी येथील तो रहिवाशी असून कामानिमित्त तो झेडपीत आला होता. टेस्ट पॉझिटिव्ह येताच त्याला उपचारासाठी शासकीय रूग्णालयात हलविण्यात आले आहे. झेडपीत दुपारी दीड वाजेपर्यंत ५७ जणांनी चाचणी करून झेडपीत प्रवेश मिळविला होता.
सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्रवेशव्दारावरच आढळला व्हिजिटर कोरोना पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 1:38 PM