पंढरपूर : तालुक्यात शेळवे येथेे अखिल भारतीय मराठा महासंघाच्या शाखेचे उद्घाटन महासंघाचे जिल्हाध्यक्ष अर्जुनराव चव्हाण यांच्या हस्ते झाले.
याप्रसंगी चव्हाण म्हणाले, मराठा समाजाला एकत्र आणून समाजाची मोट बांधली. मराठा समाजाला शैक्षणिक व नोकरीमध्ये आरक्षण मिळावे ही प्रमुख मागणी स्व. अण्णासाहेब पाटील यांनी १९८२ मध्ये लाखोंचा मोर्चा नेऊन विधानसभेत केली होती. समाजाची मोट बांधण्यासाठी त्यांनी केलेले बलिदान कदापि व्यर्थ जाणार नसल्याची ग्वाही जिल्हाध्यक्ष अर्जुनराव चव्हाण यांनी दिली. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून आर्थिक भांडवल उपलब्ध होत असून तरुणांनी उद्योजक बनण्याकडे कल द्यावा, असेही आवाहन त्यांनी केले.
याप्रसंगी शेळवेचे उपसरपंच किरण गाजरे, संभाजी वाघुले, शिवदास लोखंडे, महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन गंगथडे, तालुकाध्यक्ष संतोष जाधव, शहर सचिव सचिन थिटे, शिवदास लोखंडे, सरोदे, शाखाध्यक्ष सुरज गाजरे, सागर माने, संदेश आसबे, आकाश लोकरे, सागर ताटे, दीपक गाजरे, बाबाजी गाजरे, शुभम पाटील, दादासो गाजरे, ऋषिकेश गाजरे, विजय गाजरे, अजित गाजरे, विकी इंगोले, रोहन गाजरे, शिवाजी माने, विशाल गाजरे, निवृत्ती गाजरे, संदीप आसबे उपस्थित होते.
----
१९ मराठा महासंघ
शेळवेत अखिल भारतीय मराठा महासंघ शाखेचे उद्घाटन करताना अर्जुनराव चव्हाण.