शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचा बळी का..?";वरळीत मुलाला फायदा व्हावा यासाठी उद्धव ठाकरेंचा रईस शेख यांना पाठिंबा
2
"गेल्या अडीच वर्षांपूर्वी CM शिंदे यांनाही अशीच धमकी आली होती, पण...!"; उदय सामंत यांचा खळबळजनक आरोप
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राज्यात महायुती की महाविकास आघाडी? सर्व्हेतील धक्कादायक आकडे आले समोर
4
"...तर जरांगेंचा बोलवता धनी कोण? यावर शिक्कामोर्तब होईल"; भाजप नेते प्रविण दरेकर स्पष्टच बोलले 
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: 'शरद पवारांचे नाव घेतलं की अंगावर काटा येतो, त्यांच्यावर बोलणं..."; नरहरी झिरवाळांनी स्पष्टच सांगितलं
6
राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या १० प्रचार सभा; ८ नोव्हेंबरला पहिली सभा
7
'कोणीही मतदानापासून वंचित राहू नये, साखर कारखाने २१ नोव्हेंबरनंतर सुरु करा'; सदाभाऊ खोतांनी केली मागणी
8
हिट अँड रन प्रकरणात BMW असलेल्या भाजपा नेत्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, तपास सुरू
9
लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने पप्पू यादवांना धमकावणाऱ्याला अटक; मेव्हणीचं सिम वापरुन केला प्लॅन
10
'आयाराम गयाराम' ही म्हण राजकारणात कधी आली?; आमदाराने चक्क एका दिवसात २ पक्ष बदलले
11
सुनील केदार समर्थकांच्या बंडखोरीनं मविआत संताप; ठाकरे-पवारांच्या उमेदवारांना फटका?
12
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या युवतीच्या मृत्यूचं रहस्य; फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह
13
देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत अचानक वाढ, तपास यंत्रणा अलर्ट; नेमकं काय घडलं?
14
मराठा उमेदवारांबाबत रविवारी होणार निर्णय; अंतरवली सराटीत येण्याचे मनोज जरांगेंचे आवाहन
15
वेगवेगळ्या चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा; ज्या घरात अडकले होते, त्यालाच जवानांनी लावली आग
16
Rajnath Singh : "अशी परिस्थिती येईल जेव्हा..."; दहशतवादी हल्ल्यांबाबत राजनाथ सिंह यांची मोठी भविष्यवाणी
17
IND vs NZ, 3rd Test Day 2 Stumps: दुसऱ्या दिवशी १५ विकेट्स; तिसऱ्या दिवशीच फुटणार विजयाचे फटाके?
18
केरळमध्ये ट्रॅक साफ करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ट्रेनने उडवलं; चौघांचा मृत्यू, एकाचा मृतदेह सापडेना
19
Vidhan Sabha Election: मतदान ओळखपत्र नसेल तर काळजी नको, हे १२ पुरावे चालतील; वाचा संपूर्ण लिस्ट!
20
आबांवरील टीकेनंतर नाराजी; शरद पवारांनी अजितदादांना फटकारलं, म्हणाले...

खंडेरायाची प्रतिष्ठापना बाळाच्या रूपात; म्हणून गावाचेच नामकरण झाले ‘बाळे’

By appasaheb.patil | Published: November 27, 2019 2:46 PM

आजपासून बाळे येथील खंडोबाच्या यात्रेला होणार प्रारंभ; धार्मिक विधी पार पडणार, परराज्यातील भाविकांची जमणार मांदियाळी

ठळक मुद्देबाळे येथील खंडोबा यात्रेस बुधवार, २७ नोव्हेंबर २०१९ पासून प्रारंभ होत आहेयात्रा कालावधीत दररोज पहाटे साडेपाच वाजता काकडा आरतीसकाळी आणि रात्री सात वाजता दोन वेळा महापूजाही केली जातेदिवसभर जागरण गोंधळ, वाघ्या मुरळी, तळीभंडारा उचलणे, वारू सोडणे, खडग पूजा, जावळ काढण्याचा कार्यक्रम

आप्पासाहेब पाटील

सोलापूर : बाळे गावचे पाटील माणकोजीराव यांनी खंडोबाची बालकाच्या रूपात आपल्या देवघरात प्रतिष्ठापना केल्यामुळे त्या गावाला बाळे हे नामाभिधान प्राप्त झाले, अशी अख्यायिका आहे. माणकोजीरावांच्या घराण्यासह आता अनेकांचे कुलदैवत असलेल्या बाळेच्या खंडोबाची यात्रा आता सुरू होत असून,चंपाषष्टीपासून सुरु होणाºया मार्गशीर्ष महिन्यात दर रविवारी बाळे मंदिरात भक्तांचा महापूर असतो व संध्याकाळी ८ ते १० या वेळेत छबिना, पालखीसह गावातील मानकरी व भक्तगण यात सामील होतात़ अत्यंत सुंदर व आकर्षक दारूकाम व वाद्यांचा गजर यामुळे वातावरण भक्तिमय होते.

माणकोजीराव पाटील यांच्या कुटुंबीयांचे श्री खंडोबा हे कुलदैवत आहे़ पाटील हे अणदूर येथील खंडोबास नित्यनियमाने पायी चालत जाऊन दर्शन व पूजाविधी करत असत़ त्यांची श्री खंडोबाचरणी निस्सीम अशी भक्ती होती़ काही कालावधीनंतर श्री खंडोबा हे पाटील यांच्या स्वप्नात आले अन् माझी आपल्या देवघरात स्थापना करून तेथेच पूजा, अभिषेक कर असे सांगितले़ त्यानुसार पाटील यांनी बाळाच्या रूपात आलेल्या खंडोबाची प्रतिष्ठापना केल्याची माहिती देण्यात आली.

सोलापूर-पुणे महामार्गावर सोलापूर शहरापासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर बाळे हे गाव  आहे़ या गावात कुलदैवत श्री खंडोबाचे भव्य मंदिर आहे़  खंडोबा हे सोलापूरसह राज्यातील अनेक समाजबांधवांचे कुलदैवत आहे़ बाळे येथील खंडोबा मंदिरातील पुजारी व अणदूर येथील श्री  खंडोबाचे पुजारी एकच असून, दोन्हीकडील मंदिरात नित्यनियमाने सारखीच पूजाअर्चा केली जाते़ या मंदिराची देखभाल करण्यासाठी स्थानिक ट्रस्टची नोंद केलेली आहे़ ते मंदिराचा सर्व कारभार पाहतात.

नागदिवे यादिवशी मंदिरात भक्तगण व पाटील, तोडकरी, कांबळे, घोडके, सुरवसे व ग्रामस्थ एक लाख दिवे पाजळतात़ हा कार्यक्रम मंदिरामार्फत केला जातो.

यात्रा काळात होणारे कार्यक्रम- बाळे येथील खंडोबा यात्रेस बुधवार, २७ नोव्हेंबर २०१९ पासून प्रारंभ होत आह़े़ यात्रा कालावधीत दररोज पहाटे साडेपाच वाजता काकडा आरती, सकाळी आणि रात्री सात वाजता दोन वेळा महापूजाही केली जाते. दिवसभर जागरण गोंधळ, वाघ्या मुरळी, तळीभंडारा उचलणे, वारू सोडणे, खडग पूजा, जावळ काढण्याचा कार्यक्रम केला जातो. डिसेंबर महिन्यातील तिसºया रविवारी रात्री ८ वाजता शोभेचे दारूकाम सोहळा पार पडणार आहे. यात्रा कालावधीत खंडोबा देवाची पालखी आणि सोलापुरातून आलेल्या मानाच्या नंदीध्वजांची मिरवणूकही काढली जाणार आहे. १ जानेवारी २०२० रोजी भाविकांना महाप्रसाद वाटपाने यात्रेची सांगता होणार आहे.- ज्यांचे कुलदैवत खंडोबा असते अशा घराण्यात लग्न झाल्यानंतर नवरा-नवरी व त्यांचे कुटुंबीय दर्शनासाठी सर्वप्रथम कुलदैवत म्हणजेच खंडेरायाच्या दर्शनाला येतात. यावेळी मंदिराच्या पायºया चढताना नवरदेव नवरीला उचलून मंदिराच्या सभागृहापर्यंत नेतो अशी आपल्याकडे परंपरा आहे.

ऐतिहासिक पलंग महाल- बाळे येथील खंडोबा मंदिरात ऐतिहासिक पलंग महाल आहे़ पलंग महाल ही शिवकालीन पुरातन वस्तू आहे़ पलंगावर खंडोबा देवाचे चांदीचे आकर्षक व प्रसन्न मुखवटे आहेत़ हे चांदीचे मुखवटे अडीच ते तीन किलो वजनाचे आहेत़ यात्राकाळात पालखीत खंडोबा देवाचे हे मुखवटे ठेवले जातात़

शिवकालीन मंदिर- पुरातन शिवकालीन काळातील हे बांधकाम असल्याचे सांगण्यात आले आहे़ मात्र हे काळ्या चिºयाच्या दगडाच्या भिंती असणारे व तीन ते चार फूट रूंदीच्या भक्कम भिंती कोणी बांधल्या याचा उल्लेख नसल्याचे मंदिर समितीने सांगितले़ 

बससेवेसह पोलिसांचा  असणार बंदोबस्त...- सोलापूर-पुणे हायवेवर बाळे हे गाव असल्याने भाविकांच्या गर्दीने वाहतूक विस्कळीत होऊ नये यासाठी पोलीस आयुक्तालयाच्या शहर वाहतूक शाखेच्या वतीने वाहतुकीचे नियोजन करण्यात आले आहे. सोलापूर महापालिकेच्या वतीने भाविकांची दर्शनाला सोय व्हावी म्हणून परिवहन विभागाच्या वतीने जादा बस तैनात करण्यात आल्या आहेत. मंदिर समितीच्या वतीने भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी नियोजनबद्ध आखणी करण्यात आली आहे. यात्रेतील चोरट्यांवर अंकुश ठेवण्यासाठी मंदिरात आणि परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. 

टॅग्स :SolapurसोलापूरKhandoba Yatraखंडोबा यात्राTempleमंदिर