आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ४ : यंत्रमाग कामगारांच्या हितासाठी लवकरात लवकर कल्याणकारी मंडळ स्थापन करावे, अशी मागणी आमदार प्रणिती शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.शिंदे यांनी बुधवारी मुंबईत फडणवीस यांची शिष्टमंडळासह भेट घेऊन वरील मागणीचे निवेदन दिले. या शिष्टमंडळात नागेश बोमड्याल, रमेश पाटील, शिवराया कबलगी, रविकुमार मिरगले, पाटील, तिरूपती परकीपंडला आदी उपस्थित होते.निवेदनात नमूद केले आहे की, राज्य शासनाने २ फेब्रुवारी २०१२ मध्ये वस्त्रोद्योग क्षेत्रातील यंत्रमाग कामगारांसाठी घरकूल योजना, कामगार कल्याणकारी योजना, आरोग्य विमा योजना आदी लागू करण्याचा निर्णय घेतला. १५ आॅक्टोबर २०१३ मध्ये वस्त्रोद्योग विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करून योजनेचा आराखडा तयार करण्यात आला. तो शासनास सादरही झाला.देशातील एकूण यंत्रमाग उद्योगांपैकी राज्यात ५० टक्के उद्योग असून तो सोलापूरसह भिवंडी, मालेगाव, इचलकरंजी, विटा, सांगली या ठिकाणी आहे. या क्षेत्रात काम करणाºया कामगारांची संख्या २५ ते ३० लाखांपर्यंत आहे. त्यामध्ये महिला कामगारांची संख्या अधिक आहे. बांधकाम कामगार मंडळाच्या धर्तीवर या कामगारांसाठीही कल्याणकारी मंडळ स्थापन होणे गरजेचे आहे. यंत्रमाग कामगारांच्या हितासाठी कायदा केला पाहिजे. त्यांचे वेतन निर्धारण करून त्यांना भविष्य निर्वाह निधी, आरोग्य विमा आणि कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. यासाठी कल्याणकारी मंडळ शासनाने तातडीने स्थापन करावे, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.---------------------------मुख्यमंत्री सकारात्मकयंत्रमाग कामगारांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याच्या मागणीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकारात्मक असून त्यांनी लवकरात लवकर हे मंडळ स्थापन करण्याचे आश्वासन दिल्याचे आमदार प्रणिती शिंदे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे.
सोलापूरातील यंत्रमाग कामगारांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करा, प्रणिती शिंदे यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2017 12:05 PM
यंत्रमाग कामगारांच्या हितासाठी लवकरात लवकर कल्याणकारी मंडळ स्थापन करावे, अशी मागणी आमदार प्रणिती शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
ठळक मुद्देमुंबईत फडणवीस यांची शिष्टमंडळासह भेट घेऊन मागणीचे निवेदन दिलेदेशातील एकूण यंत्रमाग उद्योगांपैकी राज्यात ५० टक्के उद्योग बांधकाम कामगार मंडळाच्या धर्तीवर या कामगारांसाठीही कल्याणकारी मंडळ स्थापन होणे गरजेचे