वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १५ एप्रिलपासून राज्यात संचारबंदी जाहीर केली. संचारबंदीमुळे सर्वसामान्य नागरिकांवर उपासमारीची वेळ येऊ नये, यासाठी अन्न सुरक्षा योजना लाभार्थी मोफत अन्नधान्य योजनेतून लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती ३ किलो गहू, २ किलो तांदूळ याप्रमाणे एक महिना मोफत अन्नधान्य देण्याचे १३ एप्रिलला जाहीर केले. त्यानंतर १५ एप्रिलला रात्री ८ वाजल्यापासून राज्यामध्ये कडक निर्बंध लावण्यात आले.
त्यामुळे सरकारने मोफत जाहीर केलेले धान्य घेण्यासाठी सांगोला तालुक्यातील हजारो शिधापत्रिकाधारकांनी शिधावाटप दुकानांकडे धाव घेतली. मात्र, दुकानदारांकडून अद्याप आम्हाला मोफत धान्य वाटपासंदर्भात आदेश आले नाहीत, धान्याचा कोटा आला नाही. धान्य कधी येईल असे दुकानदारांना विचारल्यास धान्य आल्यावर कळविण्यात येईल, असे सांगण्यात येत आहे.
यावर तहसीलदारांनी शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी करून
लॉकडाऊन काळात गोरगरीब लाभार्थ्यांना रेशन दुकानातून मोफत धान्याचा पुरवठा करायला हवा होता. मात्र, तहसीलदारांचे धान्य वाटपाकडे दुर्लक्ष झाल्याने हजारो लाभार्थ्यांना मोफत धान्य मिळण्यासाठी मे उजाडण्याची वाट पहावी लागणार आहे.
कोट ::::::::::::::::::
मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्याप्रमाणे अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत प्रति व्यक्ती ३ किलो गहू व २ किलो तांदूळ मोफत धान्य वाटपाचा आदेश प्राप्त झाला आहे. मात्र त्याची अंमलबजावणी मे महिन्यात केली जाईल. कारण जिल्हा पुरवठा विभागाकडून तसा अद्याप कोटा प्राप्त झाला नाही.
- अभिजित पाटील, तहसीलदार सांगोला