त्यानंतर तरी किमान या नवीन रस्त्याच्या कामाला सुरूवात होईल, अशी अपेक्षा नागरिक शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात होती. मात्र ही अपेक्षा फोल ठरल्याचे चित्र असून प्रशासनाकडून पुन्हा खड्ड्यात खडी टाकून मलमपट्टी करण्याचे काम सुरू केले आहे. सध्या ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम सुरू आहे. त्यामुळे हा प्रश्न पुन्हा चव्हाट्यावर आला असून याबाबत अधिकारी, लोकप्रतिनिधींनी यामध्ये लक्ष घालण्याची मागणी नागरिक, शेतकऱ्यांतून होत आहे.
अजित पवारांकडे पाठपुरावा करणार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाराजी व्यक्त करूनही रस्त्याची अवस्था जैसे थे आहे. शिवाय पटवर्धन कुरोली येथील भीमा नदीवर कौठाळीच्या धर्तीवर नवीन पूल उभारण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या. याबाबतही अधिकाऱ्यांकडून फारशी अपेक्षीत उत्तरे मिळत नसल्यामुळे शेतकरी, राष्ट्रवादीचे पदाधिकारी नाराज आहेत. त्यामुळे पेनूर, भोसेपाटीमार्गे पटवर्धन कुरोली रस्त्याचे काम कायमस्वरूपी मजबुत करावे, नवीन पुलाबाबत भूमिका स्पष्ट करावी, यासाठी उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्याकडे मागणी करणार असल्याचे राष्ट्रवादी पदवीधर संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुग्रीव कोळी यांनी सांगितले.