आॅनलाइन लोकमत सोलापूरपंढरपूर दि १८ : श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात भाविकांना सोयी सुविधा पुरविताना तुम्हाला वरीष्ठ पातळीवर काही अडचणी आल्या, तर मी नक्कीच प्रयत्न करेन. पंढरीत येणार प्रत्येक भाविक विठ्ठल समान आहे, यामुळे त्याची भक्तीभावाने सेवा करा असा सल्ला राष्टÑीय स्वंयसेवक संघाचे अध्यक्ष मोहन भागवत यांनी मंदिर समितीच्या पदाधिकाºयांना व कर्मचाºयांना दिला.डॉ. मोहन भागवत यांनी बुधवारी सकाळी आठच्या सुमारास श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्यावतीने अध्यक्ष डॉ. अतूल भोसले यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी सदस्य शंकुतला नडगिरे, दिनेश कदम, सचिन अधटराव, भास्करगिरी गुरु किसनगिरी बाबा, गहिनीनाथ महाराज (औसेकर), संभाजी शिंदे, कार्यकारी अधिकारी सचिन ढोले, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड आदी उपस्थित होते.त्यानंतर डॉ. मोहन भागवत यांनी मंदिर समितीच्या पदाधिकाºयांशी चर्चा करताना ते म्हणाले, मंदिर समितीचे कामकाज उत्कृष्ट असून भाविकांना सोयी सुविधा देण्याचे काम मंदिर समितीकडून चांगल्या प्रकारे होत असल्याने त्यांनी समाधना व्यक्त केले.डॉ. मोहन भागवत यांनी विठ्ठल-रुक्मिणी सह नामदेव पायरी व संत चोखामेळाचेही दर्शन घेतले.
प्रत्येक भाविक विठ्ठला समान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचे मत, पंढरपूरातील विठ्ठलासह संत चोखांबाचे दर्शन घेतले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 11:47 AM
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात भाविकांना सोयी सुविधा पुरविताना तुम्हाला वरीष्ठ पातळीवर काही अडचणी आल्या, तर मी नक्कीच प्रयत्न करेन. पंढरीत येणार प्रत्येक भाविक विठ्ठल समान आहे, यामुळे त्याची भक्तीभावाने सेवा करा असा सल्ला राष्टÑीय स्वंयसेवक संघाचे अध्यक्ष मोहन भागवत यांनी मंदिर समितीच्या पदाधिकाºयांना व कर्मचाºयांना दिला.
ठळक मुद्देडॉ. मोहन भागवत यांनी बुधवारी सकाळी आठच्या सुमारास श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन घेतलेमंदिर समितीच्यावतीने अध्यक्ष डॉ. अतूल भोसले यांच्या हस्ते सन्मान करण्यात आलामोहन भागवत यांनी विठ्ठल-रुक्मिणी सह नामदेव पायरी व संत चोखामेळाचेही दर्शन घेतले