सोलापूर: कृष्णा-भीमा स्थिरीकरणाचे स्वप्न सर्वांनी पाहिले पाहिजे, सर्वांनी या कामाला प्राधान्य दिले तरच जिल्ह्यातील सिंचन क्षेत्र आणखी वाढेल, अशी अपेक्षा नूतन खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली़मोदी लाटेमुळे मला विजय मिळविण्यासाठी त्रास सोसावा लागला याची कबुली त्यांनी यावेळी दिली़ माढ्याच्या अटीतटीच्या लढतीमध्ये विजयसिंहांनी विजय खेचून घेतला़ रविवारी ते अक्कलकोट, तुळजापूर येथे देवदर्शनासाठी आले होते, सायंकाळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला़ सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रांत खेलबुडे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले़ राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष महेश गादेकर, उपमहापौर हारूण सय्यद, नगरसेवक प्रवीण डोंगरे, विजय-प्रताप युवा मंचचे शहराध्यक्ष राजू सुपाते, नगरसेविका निर्मला जाधव, प्रा. भोजराज पवार, महिला बालकल्याण सभापती खैरूनबी शेख यांच्यासह नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते़ संपूर्ण देशात नरेंद्र मोदी यांची लाट असल्यामुळे विजय मिळविण्यासाठी कष्ट करावे लागले काय असे विचारता त्यांनी हे मान्य केले़ मी लोकांमध्ये उठतो-बसतो, शिवाय छोट्या-मोठ्या कार्यकर्त्यांपासून पदाधिकार्यांपर्यंत, आमदारांपर्यंत एवढेच नव्हे तर खुद्द शरद पवार यांनीदेखील ताकद लावली होती म्हणून मी विजयी झालो असे ते म्हणाले़ फलटण, सांगोला आणि करमाळा या मतदारसंघात पाण्याचा प्रश्न असल्यामुळे कमी लीड मिळाला असे ते म्हणाले़ प्रतापसिंह तसेच राजू शेट्टी यांनी खूप टीका केली तरीही आपण गप्प बसलात यावर विजयसिंह म्हणाले, माझे काम लोकांना माहीत आहे त्यामुळे मी कधीच का टीकेला उत्तर दिले नाही़ शिट्टी चिन्हामुळे आपणाला फायदा झाला का, प्रतापसिंहांची मते तुमची आहेत का यावर विजयसिंह म्हणाले प्रत्येकाची वेगळी ताकद असते आपल्याला तरी चांगली मते मिळालीच ना? ----------- विधानसभेवर परिणाम नाही ४या लोकसभा निवडणुकीच्या निकालामुळे येणार्या विधानसभा निवडणुकीवर कोणताही परिणाम होणार नाही असे विजयसिंहांनी प्रश्नाला उत्तर देताना सांगितले़ सोलापुरातून सुशीलकुमार शिंदे यांनी चांगले काम केले ते निवडून यायला पाहिजे होते मात्र जनतेने त्यांना निवडून दिले नाही असे विजयसिंह म्हणाले़