शहरं
Join us  
Trending Stories
1
घोळ संपेना! मविआचा नवा फॉर्म्युला, तिघांना प्रत्येकी ९० जागा; १८ जागा मित्र पक्षांना
2
आजचे राशीभविष्य: ३ राशींना अनुकूल, आर्थिक लाभ संभवतात; सुखाचा, शांततेचा दिवस
3
मिलिंद देवरा यांना शिंदेसेनेकडून उमेदवारी? वरळीतून आदित्य ठाकरेंच्या विरोधात रिंगणात
4
ठाण्यात मनसे-महायुती छुपी युती? ठाणे, कल्याण, डोंबिवलीत निवडणूक लढण्याची शक्यता धूसर
5
१३८ कोटींचे सोने पकडले; विशेष चारचाकी वाहनावर पुण्यात कारवाई; कायदेशीर प्रक्रिया सुरू
6
भाजप, शिंदेसेनेच्या तीव्र विरोधामुळे नवाब मलिक यांना अद्याप तरी उमेदवारी नाहीच!
7
विधानसभा निवडणूक: पोलिसांच्या नाकाबंदीत खालापूर टोल नाक्यावर दहा कोटींची चांदी जप्त
8
३६ जागांवर महायुती अन् मविआचेही ‘वेट अँड वॉच’; एकमेकांच्या उमेदवारांची प्रतीक्षा
9
राजकारणातील सर्वच पुतण्यांचा DNA एकसारखाच, अडचणीत आणाल तर...- छगन भुजबळ
10
राहुल नार्वेकरांच्या मालमत्तेत चार कोटींची वाढ; पाच वर्षात आशिष शेलारांची संपत्तीत किती वाढली?
11
रांगोळीवरही निवडणुकीचा रंग! पालघरमधील सफाळेत मतदान जनजागृतीचे अनोखे आवाहन
12
जयश्री थोरातांवर बोलताना भाजपा नेत्याची जीभ घसरली; संगमनेरमध्ये तणाव, वाहनांची तोडफोड
13
तुला नाउमेद करणार नाही; उद्धव ठाकरेंचा नाराज सुधीर साळवींना शब्द, शिवडीतील बंड थंड
14
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, पाहा कुणाला संधी?
15
काँग्रेसला कमी जागा मिळाल्याने राहुल गांधी नाराज; नाना पटोलेंनी सांगितले बैठकीत काय झालं?
16
बंडखोरी जिव्हारी; फक्त अजित पवारच नाही, शरद पवारांच्या हिटलिस्टमध्ये राष्ट्रवादीचे 'हे' 10 नेते
17
इन आँखो की मस्ती में... बॉलिवूड गाजवणाऱ्या मराठमोळ्या मृणाल ठाकूरचं 'रॉयल' फोटोशूट (Photos)
18
मेहबूब शेख यांच्या उमेदवारीमागे वेगळीच शंका; माजी आमदारांसह १५० पदाधिकाऱ्यांचा राजीनामा
19
पदयात्रेदरम्यान अरविंद केजरीवालांवर हल्ला; AAP चा दावा, भाजपवर हल्ल्याचा आरोप
20
कागलमध्ये राडा! मुश्रीफ आणि घाटगे समर्थक भिडले; एकमेकांची कॉलर पकडून हाणामारी

व्वा! वंदे भारत मध्ये सारं काही ऑटोमॅटिक; दार उघडण्यापूर्वीच स्थिरावतात स्टेप्स

By बाळकृष्ण दोड्डी | Published: February 03, 2023 1:52 PM

सोलापूरचे लोको पायलट अर्थात ट्रेन चालक प्रशांत बिडे यांनी गुरुवारी वंदे भारत रेल्वेची चाचणी घेतली.

सोलापूर :

सोलापूरचे लोको पायलट अर्थात ट्रेन चालक प्रशांत बिडे यांनी गुरुवारी वंदे भारत रेल्वेची चाचणी घेतली. सोलापूर रेल्वे स्थानकावरून सकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी वंदे भारत पुण्याकडे रवाना झाली. अवघ्या तीन तास वीस मिनिटांत त्यांनी पुणे स्थानकावर गाडी आणली. या ट्रेनमध्ये सारं काही ऑटोमॅटिक असून, दरवाजा उघडण्यापूर्वीच फलाटावर स्टेप्स स्थिरावतात. शिवाय प्रत्येक एक्झिक्यूटिव्ह सीटिंगला मोबाईल चार्जिंग पाॅइंटही आहे.

दहा फेब्रुवारी रोजी मुंबई सोलापूर वंदे भारत ट्रेनचे उद्घाटन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईत दुपारी तीन वाजता उद्घाटन कार्यक्रम होणार आहे. या पार्श्वभूमीवर वंदे भारतची गुरुवारी चाचणी झाली. गुरुवारी पहाटे एक वाजून पंचवीस मिनिटांनी ही नवीन गाडी सोलापूर रेल्वे स्थानकावर आली. त्यानंतर सहा वाजून पाच मिनिटांनी प्लॅटफाॅर्म क्रमांक दोनवरून पुण्याकडे रवाना झाली आहे. पहिली चाचणी सोलापूर ते पुणे अशी झाली. ही गाडी सकाळी ९ वाजून २५ मिनिटाला पुण्यात पोहोचली. म्हणजे ही गाडी अवघ्या तीन तास वीस मिनिटांनी पुण्याला पोहोचली. दुपारी साडेबारापर्यंत ही गाडी पुण्यात थांबून होती. इथे टेस्टिंगचे काम सुरू होते. दुपारी चार वाजून पंचवीस मिनिटांनी पुण्याहून मुंबईकडे रवाना झाल्याची माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

रेल्वे थांबताना तसेच डोअर ओपन होण्यापूर्वी प्लॅटफार्मवर ऑटोमॅटिक स्टेप्स स्थिरावतात. त्यानंतरच डोअर ओपन होते. पहिल्या डब्यातून शेवटच्या सोळाव्या डब्यापर्यंत सहज जाता येते. सर्व खुर्च्या आरामदायी असून, प्रत्येक सीटिंगला चार्जिंग पाॅइंट आहे. दोन्ही बाजूने गाडी चालवण्याची विशेष सोय, त्यामुळे इंजिन बदलण्याची झंझट कायमची मिटली आहे. प्रत्येक डब्यात फोनची सुविधा असून, फोनवरून ट्रेन मॅनेजरशी प्रवासी संवाद करू शकतात. आपत्कालीन सेवेचा लाभ घेऊ शकतात. संपूर्ण गाडी वातानुकूलित असल्याने आरामदायी प्रवासाची सोय. ही वैशिष्ट्ये आहेत सोलापुरातून सुरू होणाऱ्या नवीन वंदे भारत रेल्वेची. गुरुवारी पहाटे ही गाडी बराच वेळ सोलापूर रेल्वे स्थानकावर थांबून होती. नवीन आणि ऑटोमॅटिक वंदे भारत रेल्वे पाहण्यासाठी प्रवाशांची गर्दी झाली होती.