मंगळवेढा : मंगळवेढा तालुक्यातील भाळवणी गावातील प्रशासनाने सील केलेल्या फटाक्याच्या कारखान्याच्या जवळ असणाºया कंपनीच्या कार्यालयात नमुने म्हणून ठेवण्यात आलेल्या फटाक्यांचा स्फोट झाल्याने खळबळ उडाली. सोमवारी सकाळच्या सुमारास ही स्फोटाची घटना घडल्याने परिसरात घबराट पसरली. दरम्यान प्रशासनाने उत्पादनावावर बंदी घातली असताना नियमांचे उल्लंघन करणाºया विरुद्ध गुन्हे दाखल करणार असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी दत्तात्रय पाटील यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले.
सोमवार सकाळी ८.४० मिनिटांपासून फटाक्यांच्या स्फोटाचा आवाज येण्यास सुरुवात झाली. फटाक्यांचे आवाज व धुराने परिसर व्यापून गेला. कारखाना सील असतानादेखील स्फोट झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी या कारखान्यात स्फोट झाले होते. भाळवणी ग्रामस्थांनी हा कारखाना बंद करण्याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन दिले होते, त्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार याबाबत प्रांताधिकारी यांना सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या़ त्यानुसार प्रांताधिकारी यांनी हा फटाक्यांचा कारखाना बंद करण्याबाबत अहवाल दिला होता़.
त्यानुसार पोलीस प्रशासनाने कारखाना मालकास उत्पादन बंद करण्याबाबत नोटीस बजावली होती तसेच प्रशासनाने कारवाई करत कारखाना सील केला होता. मात्र सध्या जो फटाक्यांचा माल होता तो विविध नमुने म्हणून कार्यालयात ठेवलेले फटाके होते़ त्याचा स्फोट झाल्याबाबत माहिती उपलब्ध झाल्याची पोलीस उपविभागीय अधिकारी दत्तात्रय पाटील यांनी सांगितले़ फटाक्यांच्या उत्पादनास बंदी असताना हे फटाके आले कोठून असा प्रश्न असून जर नमुने म्हणून ठेवण्यात आलेले फटाके असले तरी ते सुरक्षितस्थळी का ठेवण्यात आले नाहीत असा प्रश्न असून निष्काळजीपणा व प्रशासनाने दिलेले आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल संबंधित कारखाना मालकांवर गुन्हा दाखल केला जाईल असे पोलीस प्रशासनाने सांगितले.भाळवणी येथील फटाके कारखाना सील केला होता संबंधित मालकाला याबाबत जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्या सूचनेनुसार उत्पादन करू नये याबाबत नोटीस दिली होती तरीही ही घटना घडली आहे याबाबत सविस्तर चौकशी करून संबंधित दोषी वर गुन्हे दाखल केले जातील- दत्तात्रय पाटील,
उपविभागीय पोलिस अधिकारी, मंगळवेढा