मारुती वाघ
मोडनिंब: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बोर अडत बाजारात दररोज प्रत्येकी पन्नास किलो वजनाच्या आठ हजारांपेक्षा जास्त पिशव्यांची आवक होत आहे. परराज्यात दररोज २५ ट्रक बोरांची निर्यात होत आहे. या बोरांच्या खरेदीसाठी महाराष्टÑासह परराज्यातील व्यापाºयांचा मोडनिंबच्या मार्केटकडे ओढा वाढला आहे.
मोडनिंब येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अडत बोर बाजारात दररोज मोहोळ, पंढरपूर, माढा, सांगोला, बार्शी, मंगळवेढा या तालुक्यातील ढेकळेवाडी, करकंब, तुळशी, अरण, भेंड, पडसाळी, उंबरगाव, खर्डी, बार्डी, वडापूर, कुसळंब, येरमाळा, वैराग, कोन्हेरी, पापरी, खंडाळी, शेटफळ, खरातवाडी, जाधववाडी, मेंढापूर यांसह अन्य भागांतून शेतकरी मोडनिंबच्या बोर बाजारात विक्रीस आणत आहेत. प्रतिकिलो १० रुपये दराने या बोरांची विक्री होत आहे.
मार्के टमध्ये आलेली बोरे लिलाव झाल्यानंतर ती अन्य राज्यांमध्ये पाठवण्यात येत असून,सदर बोरे खरेदी करण्यासाठी त्या राज्यांमधील व्यापारी मोडनिंब येथे मुक्कामाला दाखल होत आहेत. यामध्ये अहमदाबाद, बडोदा, सुरत, उदयपूर, जयपूर, मेहसाना (गुजरात), कोटपुतली (आंध्रप्रदेश), राजमुंद्री, पुणे, मुंबई, राहुरी, नाशिक, संगमनेर, नागपूर, चंद्रपूर, गोध्रा दावत या भागात दररोज सुमारे पंचवीस ट्रक बोरे मोडनिंब बोर बाजारातून जात असल्याचे सिद्धेश्वर ट्रान्स्पोर्टचे माऊली भांगे यांनी सांगितले.
चैतन्य फ्रूट कंपनी, आलिशान फ्रूट कंपनी, समीर फूट कंपनी, घोलप फ्रूट कंपनी, गावडे फ्रूट कंपनी, जय भवानी फ्रूट कंपनी, संगम फ्रूट कंपनी, जाधव अँड कंपनी, किसान फ्रूट कंपनी या अडत व्यापाºयांनी सांगितले की, मोडनिंबच्या बोर अडत बाजारात सोलापूर जिल्ह्यातील बोर उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात बोरं विक्रीस आणत आहेत. योग्य भाव आणि शेतकºयांच्या मालाची निगा हे यामागचं कारण असल्याचे त्यांनी सांगितले.
मोडनिंब अडत बाजारात विकलेल्या बोरांच्या पट्टी वेळेवर मिळत असल्यामुळे आम्ही सर्व शेतकरी बांधव मोडनिंब अडत बाजारात विक्रीसाठी बोरे घेऊन येत असल्याचे अण्णा सावंत, शफिक शेख (अरण), लक्ष्मण सावंत, दीपक इंगळे (खरातवाडी, ता. पंढरपूर), नानासाहेब ढेकळे (ढेकळेवाडी, ता. मोहोळ) या शेतकºयांनी सांगितले.