सोलापूर : सोलापूररेल्वे विभागातून धावणाऱ्या सोलापूर-लोकमान्य तिलक टर्मिनस-सोलापूर, सोलापूर-तिरूपती-सोलापूर तसेच पुणे-सोलापूर-दौंड दरम्यान धावणाऱ्या विविध गाड्यांना प्रशासनाने तीस दिवसांची मुदतवाढ दिली आहे. प्रवाशांकडून वाढता प्रतिसाद मिळत असून यामुळे या गाड्यांना मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
सोलापूर-लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष गाडी (क्रमांक ०१४३५) ही ४ जुलै पर्यंत धावणार होती. आता ही गाडी २६ जुलै पर्यंत धावणार आहे. सोलापूर-लोकमान्य टिळक टर्मिनस (क्रमांक ०१४३६) ही गाडी २८ जून पर्यंत धावणार होती. आता ही गाडी २६ जुलै पर्यंत धावणार आहे. सोलापूर-तिरुपती ही साप्ताहिक गाडी (क्रमांक ०१४३७) ही २९ जून पर्यंत धावणार होती. आता ही गाडी २७ जुलै पर्यंत धावणार आहे. तिरूपती-सोलापूर ही गाडी ३० जून पर्यंत धावणार होती. आता ही गाडी २८ जुलै पर्यंत धावणार आहे.