शहरात विनाकारण गर्दी होऊ नये म्हणून रिंगरोडच्या रस्त्याचे काम सुरू आहे. यामुळे स्वामी भक्तांना सोयीचे होणार आहे. मात्र रस्ता बनताना नगरपालिकेला विश्वासात घेतले नसल्याने हा प्रश्न निर्माण झाल्याचा आरोप नगरपालिकेकडून होत आहे.
कुरनुर येथून दहा वर्षांपूर्वी शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी पाईपलाईन टाकण्यात आली. यामुळे शहराचा पाणी पुरवठा सुरळीत सुरू झाला. या पाईपलाईनवर संपूर्ण शहर अवलंबून आहे. हा रस्ता करताना नॅशनल हायवेच्या अधिकारी यांनी स्थानिक नगरपालिका अधिकारी, पदाधिकारी यांना विश्वासात घेऊन अडचणी समजून घेणे आवश्यक होते. पण संबंधित अधिकाऱ्यांच्याकडून झालेल्या दुर्लक्षामुळे पाईपलाईन रस्त्याच्या खाली अडकली आहे. यामुळे भविष्यात देखभाल दुरुस्ती प्रश्न निर्माण होणार आहे.
यावेळी मुख्याधिकारी सचिन पाटील, नगरसेवक बसलिंगप्पा खेडगी, सद्दाम शेरीकर, विक्रांत पिसे, धनाजी मोरे, मलिक बागवान, विक्रांत पिसे आदी उपस्थित होते.
कोट:::::::::::::::::::::::::
नागरिकांच्या तक्रारीवरून या ठिकाणी येऊन पाहिले असता, पाणीपुरवठा पाईपलाईन रस्त्याखाली अडकली आहे.यामुळे भविष्यात देखभाल दुरुस्ती प्रश्न निर्माण होणार आहे. यामुळे याचे नियोजन करून रस्ता होणे अपेक्षित आहे. याबाबत संबंधित कार्यालयाशी पत्रव्यवहार करणार आहे.
- सचिन पाटील,
मुख्याधिकारी
-----
देखभाल दुरुस्ती होणार अडचणीची
हा रस्ता चुकीचे पद्धतीने होत आहे. सध्या ५० टक्के काम झाले आहे. अक्कलकोट नगरपालिका पाईपलाईन रस्त्याखाली अडकली आहे. यामुळे दुरुस्ती देखभाल अडचणीची ठरणार आहे. तसेच शेतकऱ्यांना जाणे-येण्यासाठी ज्या पद्धतीने पूल होणे अपेक्षित होते ते झाले नाही. ही बाब शेतकऱ्यांच्या आता लक्षात आले आहे. तरी दोन्ही विषय दुरुस्ती होऊन काम व्हावे अन्यथा काम बंद पाडू, असा इशारा राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दिलीप सिद्धे यांनी दिला आहे.
----
फोटो: हायवेवरील पाईपलाईनची पाहणी करताना अधिकारी व पदाधिकारी.