शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

फेसबूकद्वारे शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्यास सांगून १८ लाखाला गंडा 

By विलास जळकोटकर | Updated: March 16, 2024 19:10 IST

ऑनलाईन व्यवहार करताना कोणत्याची प्रकारच्या फसव्या लिंकना बळी पडू नये याबद्दल वारंवार आवाहन करण्यात येऊनही असे प्रकार घडतात.

सोलापूर: फेसबूकद्वारे stock frontine- G13 हा शेअर मार्केट ट्रेडिंग व्हॉटस्अप ग्रूप तयार करुन त्याद्वारे वेगवेगळ्या लिंकद्वारे पैसे भरायला लावून १७ लाख ८५ हजार रुपयांला गंडा घालण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी गोपाल दत्तात्रय मिठ्ठा यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शु्क्रवारी सायबर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध फसवणुकीसह आयटी ॲक्ट अन्वये गुन्हा नोंदला आहे. हा प्रकार १ ते १५ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत घडला. अनिल मिश्रा, आशिष शहा अशी गुन्हा नोंदलेल्यांची नावे आहेत.

फिर्यादीत म्हटले आहे की, यातील फिर्यादी आपले फेसबूक अकाऊंट पाहत असताना १ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ११ च्या सुमारास त्यांना फेसबूकवर नमूद आरोपींनी stock frontine- G13 हा शेअर मार्केट ट्रेडिंग व्हॉटस्अप ग्रूप तयार करुन त्यामध्ये वेगवेगळे मोबाईल क्रमांक ॲड केले. त्याद्वारे फिर्यादीला शेअर मार्केट व्यवसाय करण्यासाठी फिर्यादीचा विश्वास संपादन केला. त्यांच्या मोबाईलवर https:/app.chc- sesb.com/mine ही लिंक पाठवली.

फिर्यादीला प्रायमरी अकाऊंट ओपन करण्यास सांगितले. त्यांच्याकडून वेगवेगळ्या खात्यावर रक्कम जमा करुन घेतली. कंपनीच्या चार्टमध्ये फिर्यादीने खरेदी केलेल्या शेअर्स व आयपीओच्या किंमती वाढल्याचे प्रकाशीत केले. त्यातील कोणतेही प्राफिट फिर्यादीला मिळू दिले नाही. फिर्यादीने कंपनीकडे १७ लाख ८५ हजार एवढी मूळ रक्कम जमा केलेली असताना त्याचा कोणत्याची प्रकारचा परतावा मिळाला नाही. आपली फसवणक झाल्याचे लक्षात आल्याने फिर्यादीने सायबर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदविल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. फसगत टाळण्यासाठी आवाहनऑनलाईन व्यवहार करताना कोणत्याची प्रकारच्या फसव्या लिंकना बळी पडू नये याबद्दल वारंवार आवाहन करण्यात येऊनही असे प्रकार घडतात. आपली फसगत होऊ नये यासाठी सतर्क राहावे, असे आवाहन सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीशैल गजा यांनी केले आहे.

टॅग्स :Solapurसोलापूरcyber crimeसायबर क्राइमshare marketशेअर बाजार