यावेळी युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष पप्पू पाटील, सचिन मस्के, दिनेश शिंदे, विजय रणदिवे, राहुल हातगिने, सचिन पाटील, तानाजी बागल, शहाजहान शेख यांच्यासह स्वाभिमानीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
अतिवृष्टीमुळे उसाचे उत्पादन घटले
मागील वर्षी झालेली अतिवृष्टी, महापूर यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हेक्टरी उसाचे उत्पादन घटले आहे. कारखाने जो दर देत आहे, त्यामध्ये शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नाही. त्यातच शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून शेतकऱ्यांची सहमती न घेता विविध बँका, पतसंस्था यांची कर्जवसुली मोहीमही सुरू आहे. सर्वसामान्य शेतकरी कोरोना, लॉकडाऊन, अतिवृष्टीमुळे अडचणीत असताना कारखानदार त्यांच्या हक्काचे पैसे देत नाहीत. तर सरकार लक्ष देत नसल्याने शेतकरी रसातळाला जात असल्याचा आरोप स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
फोटो लाईन :::::::::::::
सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांना विविध मागण्यांचे निवेदन देताना पप्पू पाटील, सचिन मस्के, दिनेश शिंदे, विजय रणदिवे आदी.