आॅनलाइन लोकमत सोलापूरमाळशिरस दि २४ : यावर्षी साखर कारखान्यांनी धुराडे पेटण्यापूर्वी ऊस दर जाहीर करणे गरजेचे आहे़ १ नोव्हेंबरपूर्वी कारखानदारांची बैठक बोलावून संवादातून योग्य मार्ग काढला जाईल. मार्ग निघाला नाही तर संघर्ष करण्यासाठी तयार राहा़ कपाळाला कुंकू लावून मी आलो नाही तर शेतकºयांसाठी कपाळाचे कुंकू पुसून मैदानात आलो आहे. जनतेचे प्रश्न सामंजस्याने व वेळप्रसंगी संघर्षाने सोडविण्यासाठी क्रांती संघटना काम करीत आहे, असे मत कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केले़ गोरडवाडी (ता़ माळशिरस) येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते़यावेळी माजी सरपंच तुकाराम देशमुख, अॅड़ सोमनाथ वाघमोडे, जयवंत बगाडे, पं़ स़ सदस्य माऊली पाटील, अजय सकट, स्वप्नील वाघमारे, नगरसेवक मारुती देशमुख, रणजित मोटे, भगवान थोरात, डॉ़ तुकाराम ठवरे, पांडुरंग वाघमोडे, बाळासाहेब सरगर, साहेबराव देशमुख, श्रीलेखा पाटील, विकास धार्इंजे, सचिन पडळकर, सुरेश तरंगे, बाळासाहेब कर्णवर, भीमराव शेंडगे, भानुदास सालगुडे, भैय्याजी पुकळे, सुरेश वाघमोडे, सरपंच ज्ञानू कांबळे, जिल्हा कृषी विकास अधिकारी साहेबराव बेंदगुडे, उपविभागीय अधिकारी रवींद्र कांबळे, तालुका अधिकारी नंदकुमार म्हसवडे, तालुका कृषी अधिकारी राहुल जितकर, मंत्रालय सहा़ अजय वगरे, ग्रामसेवक रवींद्र पवार यांच्यासह सर्व अधिकारी उपस्थित होते़प्रारंभी ग्रामस्थांच्या वतीने सदाभाऊ खोत यांचा सत्कार करण्यात आला़ गोरडवाडी गाव १०० टक्के हागणदारीमुक्त झाले असून शेवटच्या शौचालयाचा लोकार्पण यावेळी करण्यात आला़ याप्रसंगी जिल्ह्यातील पहिल्या रयत क्रांती संघटनेची शाखा स्थापन करून त्याचे उद्घाटन करण्यात आले़ पहिले तृतीयपंथी सरपंच ज्ञानू कांबळे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी कृषी दुकानदार संघटनेच्या वतीने सदाभाऊ खोत यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी जयवंत बगाडे, भाजपाचे पांडुरंग वाघमोडे, लक्ष्मण गोरड यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी माजी सरपंच लक्ष्मण गोरड, रयत क्रांतीचे विष्णू गोरड, सरपंच भागवत कर्णवर, भिकाजी गोरड, रामचंद्र गोरड, खंडु कळसुले, पांडुरंग पिसे आदींनी परिश्रम घेतले़ प्रास्ताविक गोविंद कर्णवर यांनी केले तर आभार प्रा़ शरद कर्णवर यांनी मानले.-----------------------ठळक मुद्देमराठा आरक्षणासाठी सरकारचे प्रयत्न सुरू असून धनगर आरक्षणासाठी प्रयत्न सुरू आहेत़ बैलगाडी शर्यत सुरू ठेवण्यासाठी सुप्रीम कोर्टात जाण्याची तयारी सुरू आहे़ कांदा चाळ, ठिबक सिंचन, रोगमुक्त बियाणे अशा कृषी खात्याच्या अनेक योजनांसाठी प्रयत्न सुरू आहेत़ साखर कारखान्यांमधील अंतराची अट रद्द करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत़ पुढील काळात प्रत्येक गणात शेतकरी मेळावे घेण्यात येणार असल्याचे सदाभाऊ खोत यांनी सांगितले़
कारखानधारकांनो, धुराडे पेटण्यापूर्वी ऊस दर जाहीर करा, सदाभाऊ खोत यांचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 12:07 PM
साखर कारखान्यांनी धुराडे पेटण्यापूर्वी ऊस दर जाहीर करणे गरजेचे आहे़ १ नोव्हेंबरपूर्वी कारखानदारांची बैठक बोलावून संवादातून योग्य मार्ग काढला जाईल. मार्ग निघाला नाही तर संघर्ष करण्यासाठी तयार राहा़ असे मत कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केले़.
ठळक मुद्देबैलगाडी शर्यत सुरू ठेवण्यासाठी सुप्रीम कोर्टात जाण्याची तयारीसाखर कारखान्यांमधील अंतराची अट रद्द करण्यासाठी प्रयत्न सुरूमराठा, धनगर आरक्षणासाठी सरकारचे प्रयत्न सुरू