आॅनलाइन लोकमत सोलापूरसांगोला दि २३ : ‘देव आला द्यायला पण पदर नाही घ्यायला’ अशी अवस्था सांगोला तालुक्याची झाली आहे. यंदा परतीच्या पावसाने तारले; मात्र अधिकाºयांच्या निष्काळजीपणामुळे शेतकºयांना पाण्याविना मारले, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. माण व कोरडा नदीवरील १८ बंधारे तुडुंब भरुनही अवघ्या दोन महिन्यातच कोरडे पडले आहेत. पाण्याची गळती रोखण्यासाठी आलेला ४० लाखांचा शासकीय निधीदेखील पाण्याच्या गळतीबरोबर वाहून गेला की काय? अशी चर्चा शेतकरी वर्गातून होत आहे.यंदा परतीच्या पाऊस दमदार झाल्यामुळे ८ वर्षांनंतर सांगोला तालुक्यातून मार्गक्रमण करणाºया माण नदीवरील १६ व कोरडा नदीवरील २ असे एकूण १८ को. प. बंधारे साठवण क्षमतेच्या ८५ टक्के (१.२५० टी.एम.सी.) पाण्याने तुडुंब भरले होते. बंधाºयातील पाणीसाठा टिकून रहावा. पाण्याची गळती रोखण्यासाठी प्रशासन व नदी परिसरातील शेतकºयांनी योग्य ती काळजी घेतली होती, परंतु वर्षानुवर्षे त्याच त्या गंजलेल्या दरवाजातून पाण्याची गळती, बंधाºयाच्या दयनीय अवस्थेसह शेतकºयांकडून होणाºया पाण्याच्या उपशामुळे अवघ्या दोन महिन्यातच बंधारे कोरडे पडले आहेत. वास्तविक बंधाºयातील पाणी टिकून राहणे, गळतीतून पाणी वाया जाऊ नये यासाठी प्रशासनाने सुमारे ४० लाख रुपये खर्चून गळती काढण्याच्या कामावर खर्च केला़ असे असताना अवघ्या दोन महिन्यातच सर्व बंधारे कोरडे पडले आहेत. यामुळे येत्या उन्हाळ्यात नदीकाठच्या गावांना तीव्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार आहे. प्रशासनाने निविदा काढून ठेकेदारांकडून गळतीचे काम चोख केले की नाही याची चौकशीसुध्दा करणे गरजेचे आहे. शासन पाण्यावर कोट्यवधी रुपये खर्च करते़ तरीही पाण्याची बचत व पाणीसाठा टिकून का राहत नाही याचा हिशोब संबंधित अधिकाºयांकडून घेणे गरजेचे आहे.माण व कोरडा नदीकाठच्या शेतकºयांनी पाण्याची गळती रोखण्यासाठी वेळोवेळी तहसील व पाटबंधारे विभागाला लेखी निवेदन दिले होते. निवेदनाची दखल घेऊन तहसीलदार संजय पाटील यांनी यातील काही बंधाºयाची पाहणी करुन त्यातून गळती होत असल्याचे पाटबंधारे अधिकाºयाच्या निदर्शनास आणून दिले़ शिवाय संबंधित बंधाºयांच्या तातडीने गळती रोखाव्यात अशा सूचना केल्या होत्या, परंतु पाटबंधारे अधिकाºयांनी तहसीलदार व शेतकºयांच्या सूचनांकडे दुर्लक्ष केले. परिणामी आज बंधारे कोरडे ठणठणीत पडले आहेत. याविषयी संबंधित अधिकाºयाची चौकशी करुन कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. ----------------------गळतीकडे दुर्लक्ष; अधिकाºयांची चौकशी करा- पाटबंधारे अधिकाºयांनी जाणूनबुजून गळतीकडे दुर्लक्ष केल्याने आज नदीकाठच्या गावांना पाणी पाणी करण्याची वेळ आली आहे. मग गळतीसाठी आलेले ४० लाख रुपये कोणाच्या घशात गेले़ याबाबत संबंधित अधिकाºयाची चौकशी करावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष प्रदीप मिसाळ-पाटील यांनी केली आहे़
सांगोला तालुक्यातील १८ बंधारे कोरडे ठणठणीत, पाण्याची गळती रोखण्यात प्रशासनाला आले अपयश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 2:46 PM
‘देव आला द्यायला पण पदर नाही घ्यायला’ अशी अवस्था सांगोला तालुक्याची झाली आहे. यंदा परतीच्या पावसाने तारले; मात्र अधिकाºयांच्या निष्काळजीपणामुळे शेतकºयांना पाण्याविना मारले, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. माण व कोरडा नदीवरील १८ बंधारे तुडुंब भरुनही अवघ्या दोन महिन्यातच कोरडे पडले आहेत.
ठळक मुद्देपाण्याची गळती रोखण्यासाठी आलेला ४० लाखांचा शासकीय निधीदेखील पाण्याच्या गळतीबरोबर वाहून गेला की काय? अशी चर्चा शेतकरी वर्गातून होत आहे. पाटबंधारे अधिकाºयांनी जाणूनबुजून गळतीकडे दुर्लक्ष केल्याने आज नदीकाठच्या गावांना पाणी पाणी करण्याची वेळ आली गळतीसाठी आलेले ४० लाख रुपये कोणाच्या घशात गेले़ याबाबत संबंधित अधिकाºयाची चौकशी करावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष प्रदीप मिसाळ-पाटील यांनी केली आहे़