पंढरपूर : रोपळे (ता. पंढरपूर) येथील माजी सरपंच दिनकर नारायण कदम यांनी स्वत:च्या पार्टीतून नवीन निवडणून आलेल्या महिला सदस्याला सरपंच मिळावे, या उद्देशाने मालमत्ता रजिस्टरमध्ये खाडाखोड केली आहे. यामुळे त्यासह अन्य दोघांवर पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या माहीतीनुसार, कृष्णा हरी नवले (वय ४९, रा. विसावा मंदिर, इसबावी, पंढरपूर) हे रोपळे गावचे ग्रामसेवक आहेत. रोपळे (ता. पंढरपूर) गावातील मालमत्ता करास पात्र असलेल्या इमारती व जमिनीची नोंद (नमुना नं. ८) घेण्याकरीता ग्रामपंचायत मध्ये रजिस्टर ठेवण्यात आले आहे. ते इतर गावाला असताना त्यांना २८ जानेवारी २०२१ रोजी रोपळे येथील ग्रामपंचायत क्लार्क दशरथ कदम यांनी फोन करुन कळविले की, काल रात्री साडेआठच्या दरम्यान पुर्वीचे सरपंच दिनकर नारायण कदम (रा.रोपळे, ता.पंढरपूर) यांनी नमुना ८ चे रजिष्टर शिपाई नितीन जाधव याचे करवी त्यांचे घरी मागवून घेतले होते. व त्यानंतर दशरथ कदम यांना देखिल त्यांनी घरी बोलावून घेवून त्या रजिष्टर मध्ये त्यांनी मालमत्ता क्र. १५७९ मधील मालमतेचे वर्णन, मालकाचे नावाचे ठिकाणी असलेली महाराष्ट्र शासन पाटबंधारे विभाग व भोगवटा करणाराचे नावाचे ठिकाणी असलेले विक्रांत दिलीप चव्हाण (अतिक्रमण ) या नोंदीवर तसेच इतर सर्व रकान्यामधील नोंदीवर व्हाईटनर लावलेला होता. त्यांनी मला दमदाटी करुन माझे हस्ताक्षरामध्ये मालकाचे नाव या रकान्यामध्ये मंगल अर्जुन भोसले यांचे नाव भोगवटा करणाराचे नाव या रकान्यामध्ये खुद्द असे लिहण्यास व उर्वरीत रकान्यांमध्ये फेरफार नोंदी करुन घेतल्या आहेत. व पुढे त्यांनी सरपंच ग्रामपंचायत रोपळे बु।।, ता.पंढरपूर,जि.सोलापूर असा शिक्का मारुन सही केली आहे असे नवले यांना सांगितले. परंतू ते रजिष्टर हे केवळ मालमत्ता आकारणी करण्याकरीताचे असल्याने त्याबाबत नवले यांना काही गांभीर्य वाटले नाही. त्यामुळे त्यांनी वरिष्ठांना काही माहिती दिलेली नव्हती. त्यानंतर २२ फेब्रुवारीच्या दुपारी १२ वाजता नुतन ग्रामपंचायत सदस्य नितीन कदम, हणुमंत कदम व इतर दोन सदस्य असे रोपळे येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये कार्यालयात आले. व त्यांनी माझेकडे नमुना ८ रजिष्टर पाहण्याकरीता त्याची मागणी केली. त्यांनी रजिष्टर पाहीले. त्यावेळी रजिस्टरवर खाडाखोड कोणी केली आहे याबाबत विचारणा केली. माजी सरपंच दिनकर नारायण कदम यांनी केली असल्याचे सांगितले. तेंव्हा त्यांनी या नोंदीचे आधारे त्यांचे गटातील शशिकला दिलीप चव्हाण यांनी मंगल अर्जुन भोसले यांचेकडून मालमत्ता खरेदी घेतल्याचे दाखविले आहे. सध्या रोपळे गावचे सरपंच पदाचे आरक्षण हे अनुसुचित जमाती महिला करीता निघालेले असून रोपळे ग्रामपंचायत मध्ये शशिकला दिलीप चव्हाण या एकटयाच निवडूण आलेल्या असून त्यांनी शासकीय जागेवर अतिक्रमण केले असल्याने त्यांना त्या पदाचा लाभ घेता येणार नाही व ते रद्द होईल म्हणून सरपंच दिनकर कदम यांनी खाडाखोड करुन सदरची मालमत्ता मंगल अर्जुन भोसले यांचे नावे दाखवून ती शशिकला दिलीप चव्हाण यांना खरेदी दिल्याचे कागदोपत्री दाखविले आहे असे म्हणाले. या प्रकरणाची खात्री करुन नवेल यांनी दिनकर नारायण कदम, दशरथ मधुकर कदम, नितीन धनाजी जाधव (सर्व रा.रोपळे,ता.पंढरपूर) यांच्या विरुध्द तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.