शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

कारमधून दीड लाखाचा बनावट दारू साठा जप्त; सोलापूर 'एक्साइज'ची बार्शी तालुक्यात कारवाई

By appasaheb.patil | Published: September 26, 2022 3:07 PM

लोकमत न्युज नेटवर्क

सोलापूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाने २५ सप्टेंबर रोजी बार्शी तालुक्यात उपळेदुमाला या गावी एका कारमधून टॅंगो पंच ब्रॅंडच्या बनावट देशी दारुच्या ३२ पेट्या जप्त केल्या असून कारवाईत वाहनासह पाच लाख १२ हजार किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे की, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरिक्षक सदानंद मस्करे यांना अवैध दारूच्या वाहतुकीबाबत मिळालेल्या खात्रीलायक बातमी नुसार त्यांनी २५ सप्टेंबर रविवार रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास बार्शी-तुळजापूर रोडवरील उपळेदुमाला या गावाच्या हद्दीत सापळा रचला असता त्यांना एक स्विफ्ट डिझायर वाहन क्रमांक एमएच १२ एनयू २७५२ ही गाडी संशयितरीत्या वेगाने जात असल्याचे दिसून आले. सदर वाहनाचा पाठलाग करून वाहनास थांबवले असता त्या वाहनात दोन इसम आढळून आले. अंधाराचा फायदा घेऊन दोन्ही इसमांनी घटनास्थळावरून पळ काढला.

राज्य उत्पादन शुल्क विभागाने वाहनाची झडती घेतली असता वाहनात देशी दारू टॅंगो पंच ९० मिली क्षमतेच्या ३२ पेट्या बनावट दारूचा साठा आढळून आला. जप्त केलेल्या दारूची किंमत १ लाख १२ हजार इतकी असून वाहनासह एकूण ५ लाख १२ हजार किंमतीचा मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून हस्तगत करण्यात आलेला आहे.  दोन्ही फरार आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे. ही कारवाई निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क ब विभाग सदानंद मस्करे, जवान अनिल पांढरे, इस्माईल गोडीकट, प्रशांत इंगोले व वाहनचालक रशीद शेख यांच्या पथकाने केली आहे.

-----------

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आवाहनया विभागाकडून अवैध दारु निर्मिती, विक्री व वाहतुकीविरुद्ध कारवाईकरिता ६ पथके नेमण्यात आली असून कोणत्याही ठिकाणी अवैध हातभट्टी दारू/ ताडी निर्मिती /वाहतूक /विक्री /साठा, बनावट दारू, परराज्यातील दारू याबाबत माहिती मिळाल्यास राज्य उत्पादन शुल्क विभागाशी संपर्क साधावा, माहिती देणा-याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल, असे आवाहन अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क सोलापूर नितिन धार्मिक यांनी केले आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरExcise Departmentउत्पादन शुल्क विभागCrime Newsगुन्हेगारी