शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
5
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
6
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
7
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
8
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
9
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
10
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
11
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
12
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
13
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
14
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
15
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
16
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
17
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
18
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
19
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
20
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश

डायल ११२ वर दिली खोटी माहिती; फोन करणाऱ्याविरूद्ध गुन्हा दाखल

By संताजी शिंदे | Published: April 28, 2024 8:25 PM

संबंधित व्यक्ती विरूद्ध तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

सोलापूर : नागरिकांच्या मदतीसाठी असलेल्या डायल ११२ वर फोन करून खुन झाल्याची माहिती दिली. प्रत्यक्ष पोलिसांनी सांगितलेल्या घटनास्थळी जाऊन पहाणी केली असता, असा काही प्रकार घडला नसल्याचे समजले. त्यामुळे पोलिसांनी खोटी माहिती दिली म्हणून संबंधित व्यक्ती विरूद्ध तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

अधिक माहिती अशी की, सोलापूर तालुका पोलिस ठाण्यात हवालदार गणेश लोखंडे हे शनिवारी डायल ११२ वर ड्युटीला होते. दरम्यान त्यांना एम.डी.टी. चॅनल नंबर १ वर १२.०२ वाजण्याच्या सुमारास एका मोबाईल नंबरवरून अज्ञात व्यक्तीचा फोन आला. फोन वरील व्यक्तीने बोरामणी (ता.दक्षिण सोलापूर) येथे व्हॉलीबॉल मैदानाच्या ठिकाणी १८ वर्षीय मुलीला तिच्या नवऱ्याने अर्ध्या तासापुर्वी मारहाण करून कुऱ्हाडीने खुन केला आहे, अशी माहिती दिली. मिळालेल्या माहितीनुसार हवालदार गणेश लोखंडे यांनी पुन्हा फोन आलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क केला, मात्र संबंधित व्यक्तीने उचलला नाही.

त्यामुळे हवालदार लोखंडे हे आलेल्या फोनची खातरजमा करण्यासाठी बोरामणी गावचे पोलिस पाटील व पोलिस अंमलदार तांबे यांच्यासह घटनास्थळी गेले. तेथे जाऊन माहिती घेतली असता असा कोणताही प्रकार या ठिकाणी घडला नसल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले. डायल ११२ वर खोटी माहिती दिली म्हणून हवालदार गणेश लोखंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भारतीय दंड संहिता कलम १८२ प्रमाणे संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चुकीची माहिती दिल्यास कारवाई : देवळेकर० डायल ११२ हा लोकांच्या मदतीसाठी उपलब्ध करण्यात आलेला नंबर आहे. खरच काही अडचण असेल तर लोकांनी याचा जरूर लाभ घ्यावा. विनाकारण फोन करून चुकीची माहिती देऊ नये, हा फोन थेट मुंबई कार्यालयाला जात असतो. दिलेली माहिती चुकीची निघाल्यास संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल केला जाईल अशी माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी संकेत देवळेकर यांनी दिली. 

टॅग्स :Solapurसोलापूर