प्रभू पुजारी
पंढरपूर : सध्या दुष्काळी परिस्थितीमुळे एकीकडे पाणी टंचाई तर दुसरीकडे जनावरांच्या चाºयाचा प्रश्न भेडसावत आहे़ काय करावे शेतकºयांना सुचेनासे झाले़ त्यात उन्हाळ्यात जनावरांना हिरवा चारा उपलब्ध व्हावा म्हणून मकेची लागवड केली. परंतु आता त्या मकेवरच लष्करी अळीने अटॅक केला आहे़ ‘दुष्काळात जनावरांच्या मुखात घालण्यासाठी चार केला, पण तो लष्करी अळीनेच गिळला’ अशी व्यथा शेतकरी व्यक्त करू लागले आहेत़ त्यावर कृषी विभागाने किंवा प्रशासनाने काही तरी उपाययोजना करावी, अशी मागणी शेतकºयांमधून होऊ लागली आहे.
यंदा दुष्काळी परिस्थिती, उन्हाळ्यात जनावरांच्या चाºयासाठी काय करावे, या चिंतेत शेतकरी आहे़ दुष्काळ जाहीर होऊनही दोन-तीन महिन्यांचा कालावधी उलटला़ अद्यापपर्यंत शासनाने जनावरांसाठी काहीही उपाययोजना केल्या नाहीत़ त्यात हुमनी उसाचे फडच्या फड खराब करून टाकले़ त्या पाठोपाठ आता मकेच्या पिकावर लष्करी अळीने अटॅक केला आहे़ त्यामुळे शेतकरी आता मोठ्या संकटात सापडला आहे़ ही लष्करी अळी हिरवीगार पाने कुरतडते़ शिवाय पोग्यातील कणसावरचे दाणे नष्ट करते़ त्यामुळे मक्याची वाढ थांबून चाराही नाही आणि मकाही हाती पडत नसल्याचे दिसून येते़ परिणामी उन्हाळ्यात हिरव्या चाºयासाठी काय करावे, सुचेनासे झाल्याचे सचिन गुंड यांनी सांगितले.
काही महिन्यांपासून उसाला लागलेल्या हुमनीचा बोलबाला झाला. यावरून आमदार, खासदार, मंत्री व अधिकारी यांच्यात आरोप-प्रत्यारोप, निवेदने, पंचनामे असे रणकंदन सुरू असतानाच तालुक्यात बहुउपयोगी म्हणून प्रचलित असलेल्या मक्याचे एकमेव पीक शेतकºयांना आधार होते, मात्र तेही सध्या लष्करी अळीच्या रडारवर आल्याने शेकडो एकर मका शेती धोक्यात आली आहे. मक्याचे धाट उगवून दोन-तीन पानावर असताना ही लष्करी अळी पानेच कुरतडते़ शिवाय मका पोग्यात असेल तर ती अळी दाणे खाऊन टाकते़ त्यामुळे याचा उत्पादनावर व चाºयावर परिणाम होऊ लागला आहे. तालुका दुष्काळाच्या उंबरठ्यावर आहे. खरीप व रब्बी हंगाम वाया गेला, मात्र काही सिंचित क्षेत्रावर शेतकºयांनी मक्याची लागवड केली़ वेगवेगळ्या हवामानात तग धरणारे पीक म्हणून मक्याकडे बघितले जाते. शिवाय मकेचा ओला व सुका चारा म्हणून मोठ्या प्रमाणात वापर केला जातो़ त्यामुळे वर्षभर मकेची लागवड केली जाते.
काही केल्या अळीचा प्रादुर्भाव थांबेना- यंदा शासनाने मकेसाठी हमीभाव जाहीर केला आहे. शिवाय चारा पिकासाठी कृषी विभागाकडून बियाणांचे वाटपही केले आहे़ त्यामुळे कॅनॉल व नदीकाठच्या सिंचित क्षेत्रावर मकेची लागवड मोठ्या प्रमाणात झाली, मात्र या पिकावर पाने कुरतडणारी व पिकाच्या पोग्यात अळीचा प्रादुर्भाव दिसू लागल्यामुळे पोग्याभोवती भुश्याप्रमाणे थर साचलेला दिसू लागले आहेत़ यासाठी अनेक प्रकारच्या कीटकनाशकांची फवारणी करूनही अळीचा प्रादुर्भाव कमी होत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त दिसत आहेत. दुष्काळाच्या दाढेतून काढलेले मक्याचे पीक लष्करी अळीच्या अटॅकने आता वाया जाऊ लागले आहे.
यंदा पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने दुष्काळात जनावरांचा चारा व हमखास उत्पन्नाचे पीक म्हणून मका लागवड केली. मात्र मक्यावरील अळी आवाक्याच्या बाहेर गेली आहे. त्यामुळे प्रशासनाने उसाप्रमाणे मक्याची पाहणी व बाधित क्षेत्राचा पंचनामा करावा व नुकसानभरपाई द्यावी़-बिळ्याणसिद्ध पुजारी,शेतकरी, तामदर्डी, ता़ मंगळवेढा