केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या वतीने तीन टप्प्यात उसाचा एफआरपी देण्यासंदर्भात सुरु असलेल्या विचार विनिमयासंदर्भात संभ्रम निर्माण झाल्याने पुन्हा गोड ऊस कडू ठरू नये यासाठी सर्वपक्षीय शेतकरी पुत्र या मोहिमेत सहभागी झाल्याचे चित्र सोशल मीडियावर दिसत आहे.
----
एकरकमी बिलाशिवाय माघार नाही
उसाचा तीन टप्प्यात एफआरपी देण्याच्या केंद्र व राज्य सरकारच्या निर्णयाला विरोध आहे. यापुढे माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर आणि न्यायालयीन लढाई लढून एकरकमी ऊस बिल मिळावे यासाठी लढत राहणार आहे. एकरकमी बिल घेतल्याशिवाय माघार घेणार नाही, अशा प्रतिक्रिया स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष शिवाजी कांबळे यांनी दिली.
-
केंद्र सरकारने साखर उद्योगावरील निर्याती संदर्भातील निर्बंध शिथिल करुन साखर निर्यात वाढवावी. साखरेचे दर वाढवावे. तसेच राज्य सरकारने शेअरिंग कायद्याची अंमलबजावणी करून दोन्ही सरकार कडून योग्य तो तोडगा काढून उसाला तीन हजार रुपये हप्ता जाहीर करावा. सध्याचा एफआरपी चा कायदा आम्हाला मान्य नसून योग्य निर्णय न झाल्यास १ ऑक्टोबरनंतर सोलापूर जिल्ह्यात मोठे आंदोलन करणार आहे.
- संजय पाटील- घाटणेकर संस्थापक अध्यक्ष, बळीराजा शेतकरी संघटना