वाशिंबे परिसरातील दोनशे ते अडीचशे शेतकऱ्यांनी आज (सोमवारी) सब स्टेशन बंद करून अधिकाऱ्यांना जाब विचारला. आम्ही वीज बिल भरू शकत नाही, त्यामुळे पूर्णपणे लाईट बंद राहू द्या, ज्यावेळी आमच्याकडे पैसे येतील, तेव्हाच भरू व नंतरच लाईट चालू करा, तोपर्यंत आम्ही अंधारातच राहू, असे ठणकावून सांगितले.
सध्या कोणत्याही शेतमालाला भाव नाही. उसाची एफ.आर.पी येणे अद्याप बाकी आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक विकलांग झाला आहे. त्यामुळे आम्ही वीजबिल भरू शकत नाही. वीजबिल भरेपर्यंत लाईट सोडू नका, असे शेतकऱ्यांनी सांगितले. पर्यायाने महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी वाशिंबे उपकेंद्रावरील गावठाण फिडरसह शेतीपंपाचे फिडर बंद ठेवले आहेत. या आंदोलनात शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब झोळ, माजी सरपंच प्रताप झोळ आदी सहभागी झाले होते.
.........
फोटो ओळ
वाशिंबे येथील वीज केंद्र बंद करताना शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते.